पिसाळलेल्या कुत्र्याने तोडले चिमुकल्यांचे लचके
हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू...!
हिंगोली :
हिंगोली शहरामध्ये सद्या भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. आज सोमवारी दि. १४ मार्च रोजी एका पिसाळलेल्या भटक्या कुत्र्याने शहराच्या विविध भागातील पाच ते सहा जणांना जखमी केले आहे.तर काही चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर व शरीराचे लचके तोडले आहेत. यापैकी एका जखमी चिमुकल्याला नांदेड येथे हलविण्यात आले आहे. काही जखमीवर हिंगोलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
जखमींपैकी काही जण वंजार वाडा, पेन्शन पुरा, मस्तानशाहा नगर भागातील असल्याचे समजते. जखमींची अध्याप मात्र नावे कळू शकली नाहीत. सध्यास्थितीत पाच ते सहाजण जखमी असल्याची प्राथमिक माहिती जखमी मुलांच्या नातेवाइकांनी दिली आहे. मोकाट भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपालिकेने करावा अशी मागणी पालक वर्गातून केली जात आहे. बरोबर कुत्र्यांना पकडण्याचे साहित्य नगरपालिकेकडे नसल्यामुळे मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त होताना दिसत नाही. शेकडोंच्या संख्येने हिंगोली शहरात भटकी कुत्री रस्त्यावर फिरताना दिसतात. कुत्र्यांना वेळीच आटोक्यात आले नाही किंवा त्यांचा बंदोबस्त केला नाही तर रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिक व चिमुकल्यांना भविष्यात धोका निर्माण होत असल्याचे बोलले जात आहे.
टिप्पणी पोस्ट करा