टिनशेडचे बांधकाम पूर्ण झाल्याने नागरिकांना होणार फायदा...!शेख निहाल यांच्या पाठपुराव्याला यश



टिनशेडचे  बांधकाम पूर्ण झाल्याने नागरिकांना होणार फायदा...!

शेख निहाल यांच्या पाठपुराव्याला यश

हिंगोली 
शहरातील पेन्शनपुरा मस्जिद येथे विविध सामाजिक ,धार्मिक कार्यक्रमासाठी टिन शेडची आवश्यकता होती. मात्र माजी नगरसेवक शेख निहाल भय्या यांच्या प्रयत्नातून नगरोस्थान योजनेतून टिन शेड उभारल्याने हजारो नागरिकांना यांचा लाभ मिळणार आहे.
शहरातील पेन्शन पुरा मस्जिद परिसरात धार्मिक व सामाजिक कार्यक्रमासाठी शेड बांधकाम करण्याची मागणी  मागील अनेक वर्षापासून  पेन्शनपुरा मस्जिद  कमिटी व शहरातील समाज बांधवांची  होती.यासाठी माजी नगरसेवक शेख निहाल भैय्या यांनी पालिकेकडे पाठपुरावा केला.

त्या अनुषंगाने जिल्हा वार्षिक योजना नगरोत्थान योजना  अंतर्गत पेन्शनपुरा मस्जिद समोर रजा मैदान येथे  शेड उभारणी व इतर कामे मंजूर करून घेतली आहे. सदरील कामे आज रोजी पूर्ण झाली असून ,  या शेडचा फायदा सर्व समाज बांधवांना होणार असून सदरील इमारत विविध सामाजिक व धार्मिक कार्यक्रमकरिता उपयुक्त ठरणार आहे. टिन शेड बांधकाम झाल्याने परिसरातील नागरिकांना या वास्तूचा लाभ घेता येणार आहे. हे काम पूर्ण झाल्याबद्दल मुख्याधिकारी डॉ. अजय कुरुवाडे, नगर अभियंता रत्नाकर अडशिरे ,विजय इटकापल्ले यांचे शेख निहाल यांनी आभार मानले आहेत.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने