औंढा नागनाथ येथे उद्या रथोत्सव ;हजारो भाविकांची उपस्थिती राहणार सार्वजनिक सुट्टी जाहिर जिल्हाधिकारी

औंढा नागनाथ  येथे उद्या रथोत्सव ;
हजारो भाविकांची उपस्थिती राहणार

औंढा नागनाथः-  तिर्थक्षेञ औंढा नागनाथ येथे महाशिवरात्रीनिमित्त शुक्रवारी (ता.४) श्री नागनाथ मंदिरामध्ये रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी हजारो भाविकांची उपस्थिती राहणार आहे.

औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री यात्रेनिमित्त विविध कार्यक्रम घेतले जात आहेत. शुक्रवारी (ता.४ ) रात्री दहा वाजता रथोत्सवाचा कार्यक्रम होणार आहे. यावेळी नागनाथ संस्थानचे कर्मचारी हा रथ ओढणार असून मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जाणार आहेत. या वेळी भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, अप्पर पोलिस अधोक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपअधीक्षक विवेकानंद वाखारे, पोलिस निरीक्षक वैजेनाथ मुंडे  यांच्यासह रथोत्सवाला कडक पोलीस बंदोबस्त ठेवल्या जाणार आहे. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर राहणार आहे. रात्री बारा वाजता रथोत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता होणार आहे.

नागनाथ मंदीरात रथाची पाहणी व तपासणी

---------------------------

चार मार्चला रात्री दहा वाजता रथोत्सव असल्यामुळे हिंगोली येथील बॉम्बशोधक व बॉम्बनाशक पथकाने नागनाथ मंदिरातील सर्व रथाची बॉम्बशोधक उपकरणे व श्वान (राजा) यांच्या सहाय्याने  तपासणी केली .यावेळी हिंगोली बॉम्बशोधक व नाशक पथक हिंगोलीचे पथक प्रमुख  पोलीस उपनिरीक्षक सतीश मुळतकर, सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक आर. एल. इंगळे, सहाय्यक  पोलीस उपनिरीक्षक टी.डी.जाधव , संदीप गायकवाड ,एजाज शेख, श्वान( राजा) आदींची उपस्थिती होती
औंढा येथे  रथउत्सव असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी जितेंद्र पापळकर यांनी  शुक्रवारी सुट्टी जाहीर केली आहे 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने