पोटात आलेल्या गाठीला कंटाळून महिलेची आत्महत्या



पोटात आलेल्या गाठीला कंटाळून महिलेची आत्महत्या

 सेनगाव 
तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील एका महिलेने सतत डोके दुखी व पोटाच्या आजाराला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी गोरेगाव पोलीस ठाण्यात बुधवारी आकस्मित  मृत्यूची नोंद  करण्यात आली आहे.

या बाबत पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगाव तालुक्यातील वायचाळ पिंपरी येथील  लक्ष्मीबाई  रामचंद्र वायचाळ वय ३० यांना सतत डोके दुखी व पोटाचा आजार होता. पोटात आलेल्या गाठीला कंटाळून त्यांनी २२ फेब्रुवारी २०२२ सहारा हाँस्पीटल अकोला येथे गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत रामचंद्र वायचाळ यांनी बुधवारी ९ मार्च रोजी गोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून आकस्मित  मृत्यूची नोंद करण्यात आली.  दरम्यान, गुन्हा उशीरा दाखल करण्याचे कारण बुधवारी मयताच्या पतीचा जवाब व कागदपत्रे रामदास पेठ पोलीस ठाणे अकोला येथुन  प्राप्त झाल्याने आकस्मित  मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने