हिंगोलीत जागतिक महिला दिनी उत्कृष्ट महिलांचा सत्कार

हिंगोली शहरात आज दि.8 मार्च 2022 रोजी राजस बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, राजस अनु-जाती महिला बचतगट, व  रणरागिणी राजमाता महिला मंडळ, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरात, जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते परिवर्तनवादी  महापुरुषांच्या व स्रीरत्नांच्या प्रतिमेचे पुष्पहाराने स्वागत करून सामाजिक कार्यकर्त्या कौशल्याताई खंदारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.  कार्यक्रमाच्या अध्यक्षा यशोदाताई कोरडे, उदघाटक मिराताई गायकवाड, नंदाताई घोडे यांनी राजमाता जिजाऊ, सावीत्रीमाई फुले, धर्मचिकित्सक मुक्ता साळवे, यांच्या जीवनचरित्रावर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी जिजाताई कसबे, लताताई लोंढे,  चंदाताई ढोके, गंगाताई मेहता,  निर्मालाताई साबळे, बेबीताई गायकवाड, पार्वतीताई गायकवाड , नंदाताई मस्के, सुशिलाताई आठवले,  ज्योती गायकवाड, वर्षा सोनुने, देव्यानी गायकवाड धृपदाबाई हातागळे, गंगाताई गायकवाड, माजी.नगराध्यक्ष बबनरावजी शिखरे, राजस बहूउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष कैलास गायकवाड, सचिव सुमित कांबळे,  न.प कर्मचारी संदीप गायकवाड, महाराष्ट्र पोलीस नारायण सोनटक्के, सामाजिक कार्यकर्ते  विशाल खंदारे, दिलीप ढोके, डि. आर. हनवते विजय सोनुने, नाथा रणबावळे, साईराम खंदारे, जय घोडे, अक्षय डाखोरे, संतोष साबळे, सुशील कसबे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता  द्रौपदाताई शिखरे, कुसुमताई हनवते, बेबीताई आठवले,  अरुणाताई  कांबळे, नंदाताई मस्के, सुशिलाताई आठवले, सारीकाताई वावळे इत्यादी महिलांनी परिश्रम घेतले.
आदरणीय पत्रकार सुधाकर वाढवे यांचा विशेष सत्कार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने