रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान* : निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी

*रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान* :  निवासी उपजिल्हाधिकारी  चंद्रकांत सूर्यवंशी 
_________________________
हिंगोली : प्रतिनिधी
       रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असून ते प्रत्येक सक्षम तरुण युवकांनी रक्तदान केलेच पाहिजे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे जयंती सामाजिक समता कार्यक्रमानिमित्त घेण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिरात निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी व्यक्त केले.
      राष्ट्रनिर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 वी जयंती सामाजिक समता कार्यक्रमा निमित्ताने दिनांक : 10 एप्रिल रविवार रोजी सकाळी 11:00 वाजता भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीस उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.
    यावेळी शिबिराचे उद्घाटन: निवासी उपजिल्‍हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांनी केले, प्रमुख उपस्थितीत :राजेंद्र सूर्यवंशी जिल्हा शल्य चिकित्सक, डॉ. मोरे साहेब, डॉ. शिवाजी गिते, डॉ. चौधरी साहेब, नीरज देशमुख, बार्टी चे प्रकल्प अधिकारी सिद्धार्थ गोवंदे  आदींच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सामाजिक समता कार्यक्रम  हे (दिनांक :06 एप्रिल ते 16 एप्रिल )पर्यंत मोठ्या उत्साहाने विविध उपक्रमातुन राबविण्यात येत असून रक्तदान  हे प्रत्येक सक्षम तरुण युवकांनी रक्तदान करणे ही काळाची गरज आहे असे मत प्रास्ताविक करतांना समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे  यांनी व्यक्त केले.
    रक्तदान शिबिर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समतादूत अशोक इंगोले यांनी केले,यावेळी रक्त शिबिरासाठी डॉ. दीपमाला पाटील मॅडम रक्तसंक्रमण अधिकारी, विद्या तौर  प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रदीप सोळंके रक्तपेढी तंत्रज्ञ, रामचंद्र दुधाळकर समाजसेवा अधीक्षक, अमोल गिरी अधिपरिचारक, अरविंद कदम, नितीन चव्हाण या रक्तपेढी टीमने सहकार्य केले. समाजकल्याण बार्टी व जात पडताळणीचे कर्मचारी, कास्ट्राईब संघांचे कर्मचारी, विविध इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक, अनेक विद्यार्थ्यांनी स्वेच्छेने रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन रक्तदान केले. 
      यावेळी भीमशक्तीचे विशालभाऊ इंगोले,कास्ट्राईब कर्मचारी संघटनेचे भिमराव नेतने,प्रवीण रुईकर, गंगाधर पाईकराव, रमेश खंदारे,नामदेव सपाटे, वैभव कांबळे,जाधव सर,शासकीय मुलींचे निवासी वस्तीगृहाच्या सिंधुताई राठोड, गजानन बिहाडे, दीपक कांबळे,नागनाथ नकाते, आनंत बिजले, भास्कर वाकळे,  भगवान पठाडे आदी सामाजिक कार्यकर्ते सह विविध इन्स्टिट्यूटचे व्यवस्थापक व विद्यार्थी तरुण  युवक-युवती मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून रक्तदान शिबिरात  सहभागी झाले होते.
         रक्तदान शिबिर कार्यक्रमासाठी बार्टी चे प्रकल्पाधिकारी सिद्धार्थ गोवंदे, समतादूत सुरेश पठाडे, प्रफुल पटेबहादूर,श्रीमती ढोणे मॅडम, गिते मॅडम,संगीता खांदळे, सखाराम चव्हाण, संदीप घनतोडे, रितेश बगाटे, विजय आयरेकर, पुंडगे,  रवींद्र खंदारे,  जाधव,  शुभम यादव, हरीश पुंडगे आदिसह सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, बार्टी व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने