ॲड.स्वप्नील जी.मुळे यांच्या कवितेची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड

ॲड.स्वप्नील जी.मुळे यांच्या कवितेची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात निवड*

हिंगोली जिल्ह्यातील औंढा नाग.
येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयातील ॲड.स्वप्नील जी.मुळे यांच्या "सजा" या कवितेची उदगीर जि.लातुर येथे दि.22 ते 24 एप्रिल2022 रोजी पार पडणाऱ्या 95 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील कविकट्टा या मंचावर कविता सादरीकरणासाठी संयोजन  समितीने निवड केली आहे.संपुर्ण महाराष्ट्रातुन कविकट्टा मंचासाठी कविता मागविण्यात आलेल्या होत्या,त्यात मुळे यांच्या कवितेची निवड झाल्याचे समितीने पत्राद्वारे कळवले आहे. ॲड.मुळे यांच्या कवितेची यापुर्वी यवतमाळ व नाशिक येथे पार पडलेल्या अ.भा.म.सा.संमेलनात ही निवड करण्यात आलेली होती.
            औंढा नागनाथ  तालुक्यातुन सलग तीन वेळा अ.भा.म. साहित्य संमेलनातील कविकट्टा मध्ये निवड होण्याचा बहुमान ही ॲड.मुळे यांनी मिळवला आहे. दि.24 एप्रिल2022 रोजी त्यांना कविता सादरिकरणासाठी उदगीर येथील कविकट्टा मंचावर आमंत्रीत करण्यात आले आहे. "सजा" या कवितेच्या माध्यमातून मुळे यांनी न्यायालयात दाखल कौटुंबिक प्रकरणामध्ये लहान मुलांची होणारी परवड,कुचंबना मांडलेली आहे.ॲड.मुळे यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातुन त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने