कयाधू नदीतीरावरील महादेव मंदिरात रंगला भजन, भारुड गवळणीचा कार्यक्रम
हिंगोली -प्रतिनिधी
4 एप्रिल 2022
रेणुका माता महिला भजनी मंडळाच्या वतीने हिंगोली येथील कयाधू नदीतीरावर असलेल्या महादेव मंदिरात भजन भारुड गवळणी याचा कार्यक्रम ठेवला होता. आ. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभा निवडणुकी मध्ये निवडून येण्याकरता त्यांनी कयाधू नदी तीरावरील महादेवाला साकडे घातले होते. आ. संतोष बांगर हे निवडून आले. त्यानंतर गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर औंढा नागनाथ येथील रेणुका माता महिला भजनी मंडळांनी भजन, भारुड गवळणीचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला.
यावेळी भजन, भारुड व गवळणी ,रामाचा जप व वेशभूषा करून भारुड केले व उपस्थितांचे मने जिंकली. तसेच गाणे यामध्ये ऐ भोळ्या शंकरा ... मल्हासा म्हणे देवा मला सवत नका आणू... खंडेरायाच्या लग्नाला बाणु नवरी नटली या गाण्यांनी कयादु नदीतीरावरील महादेव मंदिर परिसर दणाणून गेला.
या भजनाच्या कार्यक्रमास गोदावरी संतोष बांगर, श्रीराम बांगर उपस्थित होते .या भजनाच्या कार्यक्रमात सुलोचना सरदेशपांडे ,विजया तपोवनकर, शरयू देव , सुनीता बंगाळे , दिपा वैद्य ,ज्योती देशपांडे, पुष्पा तपोवनकर , सुवर्णा भोपी, कल्पना चौधरी, कावेरी भोपी , शैला पंडित , उषा भोपी, कल्पना पूरजळकर, शांता पंडित, सविता पाठक, सुमन बल्लाळ, विद्या पुराणिक , संगीता बल्लाळ, रेणुका भोपी ,आशा बल्लाळ, श्रद्धा देव यासह अनेक महिला श्री रेणुकामाता महिला भजनी मंडळ औंढानागनाथ येथील कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या .
टिप्पणी पोस्ट करा