महाराष्ट्र दिनी हिंगोली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागामार्फत विविध योजना चा जागर
हिंगोली प्रतिनिधी
एक मे महाराष्ट्र दिनी राज्यातील गावागावात झेंडा वंदना च्या तसेच योजनांची माहिती पत्रिका पोहोचणार तसेच प्रशासकीय अधिकारी समता दूत देणार विविध योजनांची माहिती जनतेला देण्यात येईल
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी सामाजिक न्यायाचा जागर करण्याची अभिनय संकल्पना अमलात आणली असून या संदर्भातील शासन निर्णय सामाजिक न्याय विभागामार्फत नियमित करण्यात आला आहे
या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून संबंध हिंगोली जिल्ह्यात सामाजिक न्याय विभागाच्या सर्व योजनांची माहिती देणारी माहिती पत्रिका किंवा माहिती पुस्तिका यांचे वाटप करण्यात येणार आहे
जिल्ह्याच्या ठिकाणी
माननीय पालकमंत्री वर्षाताई गायकवाड ग्रामीण भागात लोकप्रतिनिधी किंवा शासकीय अधिकारी कर्मचारी यांच्यामार्फत या योजनाचे संक्षिप्त स्वरूपात वाचनही करण्यात येणार आहे
यावर्षी देशभरात अमृतमहोत्सव साजरा करण्यात येत आहे सामाजिक न्याय विभागाने राज्य निर्बंध मुक्त होताच माननीय श्री धनंजय मुंडे सामाजिक मंत्री न्याय व विशेष सहाय्य विभाग संकल्पनेतून राज्यभरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंतीनिमित्त विविध उपक्रम आयोजित करून अकरा दिवस जयंती साजरी करण्यात आली आहे
अनुसूचित जाती नव बुद्ध घटक यांच्यासह समाजातील आर्थिक दुर्बल मागास घटकासाठी समाजीक विभागाच्या वैयक्तिक समुहिक लाभाच्या अनेक योजना कार्यरत आहेत या योजनांच्या बाबतीत जन जागृती करून तळागाळातील गरजूंना लाभ मिळवून देणे हा यामागचा उद्देश आहे
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी झेंडावंदन होणाऱ्या शासकीय आस्थापनाच्या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या योजनांची माहिती देणारे स्टाइल्स बॅनर लावणे तसेच माहिती पत्रिका वाटप करणे यासाठी विभागाने नियोजन केले असून सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्यामार्फत या अनुभव उपक्रमाची 1 मे महाराष्ट्र दिनी अंमलबजावणी करण्यात येणार आहे असे आवाहन श्री शिवानंद मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांनी केले आहे
टिप्पणी पोस्ट करा