सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या दालनाचे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांच्या दालनाचे चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन

 हिंगोली प्रतिनिधी
13मे, शुक्रवार 2022
येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे सहाय्यक आयुक्त यांच्या दालनाचे  सुशोभीकरण   करण्यात आले असून सदर दालनाचे उद्घाटन कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी श्री दत्ता कुंभार सेवक यांच्या हस्ते करण्यात आले
 याप्रसंगी श्री शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांनी आपले मत व्यक्त करत कार्यालयात काम करत असताना नऊ ते दहा तास आपण कार्यालयात असतो त्यामुळे कार्यालय सुंदर व स्वच्छ असेल आपले आरोग्य चांगले राहते त्यामुळे कार्यालयातील चतुर्थश्रेणी कर्मचारी हे कार्यालयात स्वच्छता सुरक्षा कायद्याचे काम करत असताना त्यांच्या मनात  
कार्यालयाप्रति सद्भावना वाढीस लागते
 तसेच चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांना पण या कार्यालयात सन्मानाची वागणूक मिळावी असे मनोगत शिवानंद   मीनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली यांनी व्यक्त केले
 यावेळी शिवानंद मिनगिरे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण हिंगोली आत्माराम वागतकर श्री सिद्धार्थ गोवंदे प्रकल्प अधिकारी बार्टी श्रीकांत कोरडे सहाय्यक लेखा अधिकारी श्री मनीष राजुलवार, समाज कल्याण निरक्षक, बालाजी टेम्भूरणे समाज कल्याण निरक्षक, सुनिल वडकुते, मोतीराम फड, बाळू पवार, नितीन राठोड, शेषराव जाधव सुरेश पठाडे अशोक इंगोले प्रफुल पत्तेबहादूर श्रीमती पल्लवी गिते, सुलोचना ढोणे मीनाक्षी बांगर ज्ञानेश्वर कोरडे, शुभम यादव नागनाथ नखाते  रवी कोळी, दीपक कांबळे, संदीप घनतोडे, नितेश बगाटे गजानन कोरडे सखाराम चव्हाण राहुल कांबळे इत्यादी कर्मचारी कार्यक्रमासाठी  उपस्थित होते

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने