स्व. सातव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील
पालकमंत्री वर्षा गायकवाड
हिंगोली प्रतिनिधी
स्व. खा. राजीव सातव यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सर्वसामान्य माणसाचे, कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहील, असे प्रतिपादन राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री तथा हिंगोलीच्या पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी केले.
पालकमंत्री वर्षा गायकवाड यांनी सोमवारी कळमनुरी येथील स्व. राजीव सातव यांच्या समाधीस्थळाला भेट देवून त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी माजी मंत्री रजनीताई सातव, आ. डॉ. प्रज्ञाताई सातव, आ. तान्हाजी मुटकुळे, माजी आ. संतोष टारफे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्यासह राज्यातून आलेले विविध अधिकारी, पदाधिकारी यांनी स्व. सातव यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
याप्रसंगी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास पालकमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी भेट देवून रक्तदात्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी परिसरातील व पंचक्रोशीतील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा