११२ नंबर डायल केल्यास पोलीस आपल्या मदतीसाठी येणार धावून



११२ नंबर डायल केल्यास पोलीस आपल्या मदतीसाठी येणार धावून

हिंगोली प्रतिनिधी 
 नागरिकांच्या येणाऱ्या अडचणीला मात करण्यासाठी पोलीस प्रशासनच्या वतीने प्रत्येक पोलीस ठाण्याला दोन दुचाकी अशा २६ दुचाकीचे पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या हस्ते शनिवारी वितरण करण्यात आल्याने ११२ नंबरवर डायल केल्यास पोलीस आपल्या मदतीला धावून येणार आहेत. त्यामुळे आपल्याला मदत होईल.
जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तसेच नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास तात्काळ ११२ हा नंबर डायल केल्यास पोलीस आपल्या मदतीसाठी धावून यावे यासाठी 
जिल्हा पोलिस प्रशासनाच्या वतीने तेरा पोलीस स्टेशनला प्रत्येकी दोन मोटरसायकल देण्यात आल्या. या दुचाकीवर ११२ हा नंबर रेखांकित केला  असून नागरिकांना कोणतीही अडचण आल्यास डायल ११२ यानंबर वर संपर्क साधल्यास पोलिसांच्या वतीने तात्काळ मदत करण्यासाठी या दुचाकीचा वापर करण्यात येणार आहे.
 यावेळी  सहाय्यक पोलीस अधीक्षक यतिश देशमुख, उपविभागीय अधिकारी वाखारे, उपविभागीय पोलिस अधिकारी कांबळे यांच्या सह इतर पोलिस अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने