दुचाकी कारच्या अपघातात पत्नी ठार पती गंभीर जखमी

दुचाकी कारच्या अपघातात पत्नी ठार पती गंभीर जखमी 

हिंगोली प्रतिनिधि 
29/मे2022

अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग १६१ नवीन बायपासवर बासंबा फाट्याजवळ दुचाकी व कारचा अपघात ढोलबरी येथील 45 वर्षीय महिलेचा जागीच मृत्यू तर पतीला गंभीर दुखापत झाल्याने नांदेड येथे  हलविण्यात आले .
सविस्तर असे की 28 मे शनिवारी रात्री नऊ साडे नऊ च्या दरम्यान ढोलबरी येथील मधुकर भिवाजी कामखेडे व उषाताई मधुकर कामखेडे हे पती-पत्नी आपली मोटरसायकल क्रमांक एम एच ३८ एम  ९३०९ या दुचाकीने पिंपळखुटा येथे रहिवासी असलेल्या आपल्या बहिणीला दिवसभर शेतातील कामधंदा आटोपून भेटण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६१ वरून पिंपळखुटा कडे जात असताना नांदेड करून येणाऱ्या भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली या धडकेमध्ये पत्नी उषाताई मधुकर कामखेडे वय 45 वर्षे यांचा जागीच मृत्यू झाला तर पत्ती मधुकर भिवाजी कामखेडे वय 52 वर्ष यांच्या पायाला व कबरेला गंभीर दुखापत झाली या अपघाताचे वृत्त कळताच पिंपळखुटा येथील त्यांचे नातेवाईक शिवराम खंदारे व गावातील इतर ग्रामस्थांनी त्यांना हिंगोली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मधुकरभिवाजी कामखेडे यांना गंभीर मार लागल्याने प्रथम त्यांना शासकीय रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे हलविण्यात आले तर पत्नीचा जागेवरच मृत्यू झाल्याने शोकाकुल वातावरणात ढोलबरी या गावांमध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या निधनाने ढोलबरी गावात शोककळा  पसरली आहे गेल्या अनेक दिवसापासून रस्ते व राष्ट्रीय महामार्गाची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात आले आहे परंतु या ठिकानावर कोणत्याच प्रकारच्या सुरळीत वाहतूकीची व्यवस्था न केल्यामुळे अखेर निरपराध प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहे सदरील घटनास्थळाला बासंबा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक व्हि.डी.श्रीमनवार पोलिस ठाण्याचे पोलिस जमादार प्रविन राठोड यांनी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने