हिंगोलीत जिल्ह्यात ठिकठिकाणी नमाज अदा करून रमजान ईद साजरी...!



हिंगोलीत ठिकठिकाणी नमाज अदा करून रमजान ईद साजरी...!

महाराष्ट्र 24न्यूज 
हिंगोली -
 दोन वर्षांपूर्वी कोरोना प्रादुर्भाव असल्याने सार्वजनिक ईद साजरी करता आली नाही. यावर्षी सर्व निर्बंध हटविल्याने मुस्लिम बांधवानी मंगळवारी ईदगाह मैदानावर नमाज पठण करीत एकमेकांना आलिंगन देत ईद उत्सव करण्यात आला.
दरम्यान,  रमजान ईद निमित्त हिंगोली शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त एकमेकांना शुभेच्छा दिल्या. पवित्र आशा रमजान महिन्यातील रोजे म्हणजेच उपवास संपल्यानंतर , मागील दोन वर्ष कोरोना काळातील निर्बंधांनंतर यंदा  सामूहिक नमाज अदा करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधव ईदगाह मैदानावर एकत्र आले होते. रमजान ईदच्या या पवित्र दिवशी शहरातील सर्व मुस्लिम बांधवांनी हिंगोलीमधील ईदगाह मैदानावर एकत्र येत सामुदायिक नमाज पठण केले आहे.

यावेळी शहरातील मोठ्या प्रमाणावर मुस्लिम बांधव उपस्थित होते.  कुठे अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख पोलिस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता. ईदगाह  मैदान वर नमाज अदा करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर हजारोंच्या संख्येने गर्दी जमली होती. सकाळी आठ ते अकरा या दरम्यान काही मार्गावरील वाहतूक बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली होती. हा सण अगदी शांतता व उत्साहात पार पडला असून, पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे कुठेही वाहतुकीस अडथळा निर्माण झाला नाही. मुफ्ती काजी फमी मुद्दीन मुतवल्ली काजी यांच्या मार्गदर्शनाखाली रमजान ईद साजरी करण्यात आली. यावेळी मौलाना यांनी शांततेचा संदेश दिला.

यावेळी पालिकेचे माजी उपाध्यक्ष दिलीप चव्हाण यांच्यासह अन्य राजकीय पक्ष्याच्या नेत्यांनी ईद निमित्य इदगाह मैदानावर जाऊन मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या. तसेच पोलीस विभागाच्या वतीने अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांनी देखील ईद निमित्य मुस्लिम बांधवाना शुभेच्छा दिल्या.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने