पोलिसाला ६ जणांनी केली बेदम मारहाण हट्टा पोलिसात गुन्हा दाखल

प्रेम प्रकरणातुन पोलिसाला ६ जणांनी केली बेदम मारहाण....! 
वसमतच्या रांजोना शिवारातील घटना 

वसमत 
 तालुक्यातील रांजोना शिवारात तीन दुचाकीवर आलेल्या सहा जणांनी पोलिस कर्मचारी रमाकांत सदावर्ते यांना बेदम मारहाण केल्याची घटना मंगळवार दि. ३१ सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याचे पोलिस विभागाच्या सुत्रांनी सांगितले आहे.
कळमनुरी पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले कर्मचारी रमाकांत सदावर्ते हे मंगळवारी सकाळी त्यांच्या दुचाकी वाहनावर कळमनुरी येथून परभणीकडे समन्स बजावण्यासाठी जात होते. त्यांचे दुचाकी वाहन रांजोना शिवारात आले असतांना तीन दुचाकीवर आलेल्या सहा जणांना त्यांच्या दुचाकीला धक्का मारून खाली पाडले अन त्यानंतर त्यांना काठीने बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. अचानक झालेल्या हल्ल्‌यामुळे सदावर्ते यांना काहीही करता आले नाही. या मारहाणीनंतर हल्लोखोर पळून गेले.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपाधिक्षक किशोर कांबळे, हट्टा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गजेंद्र सरोदे, जमादार राजू ठाकूर यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी सदावर्ते यांना तातडीने उपचारासाठी वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी हट्टा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.
यामध्ये कर्मचारी सदावर्ते यांना प्रेम प्रकरणातून मारहाण झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. यामध्ये रांजोना येथील दोघे जण तर इतर चौघे जण अनोळखी असल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत समोर आले आहे.  सदावर्ते यांच्या फिर्यादीवरून हट्टा पोलिसात विरुद्ध विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने