दोन दिवशीय कार्यशाळेत ४९ नवीन पोलिस अमलदारांना कायदेविषयक प्रशिक्षण



दोन दिवशीय कार्यशाळेत ४९ नवीन पोलिस अमलदारांना प्रशिक्षण 

हिंगोली प्रतिनिधी 
20मे 2022 शुक्रवार 
येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात  ४९ नवीन पोलीस अंमलदारासाठी दोन दिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. त्या कार्यशाळेचा समारोप शुक्रवारी झाला.
हिंगोली पोलीस दलात हजर पोलीस अंमलदारांपैकी सद्या कार्यरत तपासी अंमलदारांची संख्या वाढावी व दाखल गुन्हयांचा गुणात्मक तपास होउन गुन्हयांचा जलद गतीने निपटारा व्हावा या उददेशाने पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हयातील तेरा पोलीस स्टेशन मधील ४९ पोलीस नाईक व पोलीस हवालदार जे यापुर्वी पोलीस स्टेशनला जनरल व इतर ड्युट्या करत होते. त्यांना गुन्ह्यांच्या तपासा बाबत सविस्तर मार्गदर्शन मिळावे म्हणुन अशा ४९ अंमलदारासाठी दि.१८ व १९ असे दोन दिवस पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेत नमुद पोलीस अंमलदारांना पोलीस अधिक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधिक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक  यतीश देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, तसेच सेवानिवृत पोलीस उपअधीक्षक उकडेराव चव्हाण व जिल्ह्यातील इतर तपासी अधिकारी यांनी तपासाबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच तपासातील बारकावे गुणात्मक तपास, घटनास्थळ पंचनामा व इतर तपासाबाबत प्रात्यक्षिक दाखवुन प्रशिक्षण दिले. तसेच ४९ पोलीस अमलदारांना तपासात उपयोगी साहित्यांची किट वाटप करण्यात आली. सदर कार्यशाळे मुळे जिल्हयातील कार्यरत तपासी अमलदारांच्या संख्यामध्ये नवीन तपासी अमलदारांची भर पडल्यामुळे त्यांना सविस्तर मार्गदर्शन कार्यशाळेमुळे यापुढे गुन्ह्याचा गुणात्मक व जलद गतीने निपटरा होण्यास मदत मिळणार आहे.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने