बासंबा येथे समाधान शिबीर संपन्न
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त प्रशासन आपल्या दारी या संकल्पनेतून हिंगोली तालुक्यातील बासंबा येथे महसूल मंडळ बासंबा , सिरसम बु, कनेरगाव नाका व खानापूर चि. या चार मंडळाच्या नागरिकांकरिता आयोजित समाधान योजना शिबिर दिनांक १३ जून २०२२ रोजी संपन्न झाले या शिबीरास जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार श्री. संतोष बांगर , उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी , जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे, तहसीलदार नवनाथ वगवाड, उपमुख्य कार्यकारी अधिकारी बोंढारे, आत्माचे प्रकल्प संचालक सहारे व विविध विभागातील कार्यालय प्रमुख व त्यांचे अधिनस्त सर्व कर्मचारी उपस्थित होते.
समाधान शिबीरात एकुण 18 विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. सदर स्टॉलमध्ये नागरीकांना विविध विभागाच्या योजना बाबत माहिती देण्यात आली. ज्या सुविधा तात्काळ उपलब्ध करुन देणे शक्य आहे त्या सुविधा तेथेच उपलब्ध करून दिल्या. नागरिकांच्या मागणीबाबत व तक्रारीवर तेथेच समाधान करण्यात आले. स्टॉलमध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे आमदार संतोष बांगर, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार नवनाथ वगवाड यांचे हस्ते आपले सरकार सेवा केंद्र व ग्रामपंचायत मार्फत उत्पन्नाचे प्रमाणपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचे , वय व अधिवास , राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र, अल्पभूधारक प्रमाणपत्र, ईडब्ल्यूएस प्रमाणपत्र , नॉनक्रिमीलेअर प्रमाणपत्र , श्रमदान कार्ड असे एकूण 474 दाखले नागरिकांना वितरित करण्यात आले. महिला व बालाविकास प्रकल्प अधिकारी अँड. अनुराधा पंडीत यांनी कायदेविषयक मार्गदर्शन तसेच बालविवाह कायदेविषय इत्यादी बाबीवर मार्गदर्शन केले. बासंबा , सिरसम बु. , कनेरगाव नाका व खानापूर चि. या चार मंडळाची फेरफार अदालत घेण्यात आली असून फेरफार अदालतीमध्ये 97 फेरफार मंजूर करण्यात आले आहेत. सदर फेरफार नकला व अद्ययावत सातबाराचे वितरण नागरिकांना करण्यात आले. संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 73 अर्ज मंजूर करण्यात आले असून अर्ज मंजुरी बाबतचे पत्र लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. तहसील कार्यालयाचे निवडणूक शाखा , पुरवठा शाखा , नैसर्गिक आपत्ती शाखा , जमीन-१, जमीन-२ शाखा यांचे मार्फत नागरीकांना विविध योजनेची माहिती देण्यात आली तसेच त्यांचे अर्ज स्विकारण्यात आले. आरोग्य विभागामार्फत आरोग्य तपासणी शिबिर covid-19 , लसीकरण, covid-19 rt-pcr, BP, Sugar, तपासणी करण्यात आली. बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत गरोदर व स्तनदा मातांना पोषण आहार बाबत मार्गदर्शन करण्यात आले तसेच त्यांचे विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यात आली पंचायत समिती मार्फत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना घरकुल योजना बाबत माहिती तसेच कमी जागेमध्ये सेफटी संडास कसा उभारण्यात यावा याबाबत व इतर योतनेची माहिती देण्यात आली व तक्रारीचे निरसन करण्यात आले ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत उमेद संस्थेमार्फत बनविण्यात आलेल्या घरगुती वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या. कृषी विभागामार्फत सोयाबीन उत्पादन उगवण क्षमता तपासणी व फळबाग लागवड योजना कशी करावी याबाबत माहिती देण्यात आली., दि. परभणी जिल्हा मध्यवर्ती बँक मार्फत पीक कर्ज वाटप व इतर योजना बाबत माहिती देण्यात आली. तसेच SBI ग्रामीण स्वयंरोजगार संस्था हिंगोली. उमेद यांनी औद्योगिक कर्ज मिळणे बाबत तसेच इतर बाबीवर मार्गदर्शन आणि शंका निरसन केले. पोलीस विभागामार्फत दामिनी पथक , जननी अभियान, डायल 112 बाबत मार्गदर्शन करण्यात आले. कामगार विभागामार्फत कामगारांसाठी असलेल्या योजनांची माहिती देण्यात आली. भूमी अभिलेख विभागामार्फत मोजणी प्रक्रियेबाबत मार्गदर्शन तसेच जुन्या हद्दी, खुणा, पायवाट, गाडीरस्ते, पांदणरस्ते इत्यादि बाबत नकाशे पाहणीसाठी उपलब्ध ठेवण्यात आले. आगार व्यवस्थापक एसटी महामंडळ मार्फत विविध योजनांची माहिती देण्यात आली. कृषी विभागामार्फत पात्र शेतकरी यांना रोटावेटर यंत्र याबाबत माहिती देण्यात आली. तसेच पात्र लभार्थी रामचंद्र गायकवाड, खंडाळा यांना रोटावेटर यंत्र वाटप करण्यात आले . ग्रामपंचायत बासंबा मार्फत मा. आमदार संतोषरावजी बांगर यांचे हस्ते थोडसे मायबापासाठी छत्री वाटप करण्यात आली. तसेच मा. आमदार साहेब यांनी थोडसे मायबापासाठी या योजनेची माहिती नागरीकाना देऊन मार्गदर्शन करुन शासनाकडुन विविध पुरविल्या जाणाऱ्या योजनांचा जास्तीत जास्त लोकांनी लाभ घ्यावा असे अवाहन केले. मा. जिल्हाधिकारी हिंगोली जितेंद्रजी पापळकर यांनी महा डी.पी. ऑपवर किती लोकांनी नोंदणी केली आहे याबाबत विचारणा करून ज्या लोकांनी अद्यापपर्यत नोंदणी केली नाही त्या लोकांनी कृषी विभाग यंत्रणे मार्फत जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करुन घेणे बाबत अवाहन केले. ईपीक पाहणी अॅप वर जास्तीत जास्त लोकांनी नोंदणी करावी तसेच ज्या लोकांना नोंदणी करता येत नाही अशा लोकांनी csc सेंटर मार्फत नोंद करण्यात याव्यात. कस्टम हार्वेस्टिंग मार्फत कमी दरात भाड्याने उपलब्ध करुन देण्यात येणारी यंत्र सामुग्री चा वापर करणे बाबत तसेच यंत्र सामग्री उपलब्ध करण्या स नकार दिल्यास संबंधित शेतकरी यांनी तालुका कृषी अधिकारी यांच्या कार्यालयात नोंद करावी असे अवाहन केले. तसेच पांदण रस्ता बाबत तक्रार असेल तर तालुका अधिक्षक, भुमी अभिलेख यांचेकडुन मोजणी करुन घेऊन तहसिलदार यांचे कडे संपर्क साधावा तसेच फळबाग लागवड इत्यादी शासना कडुन पुरविल्या जाणाऱ्या योजने बाबत मार्गदर्शन केले. स्टॉलला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, आमदार संतोष बांगर उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी आणि तहसिलदार नवनाथ वगवाड यांनी भेटी देऊन पाहणी केली.
समाधान शिबिराचे यशस्वीतेसाठी उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसिलदार नवनाथ वगवाड तालुका कृषी अधिकारी गोविंद बंटेवाड, गटविकास अधिकारी गणेश बोथीकर, उपअधीक्षक भूमी अभिलेख राम सिद्धमवार, बालविकास प्रकल्प अधिकारी राजेश मगर, तालुका आरोग्य अधिकारी नामदेव कोरडे, अव्वल कारकून संजय घुगे, मंडळ अधिकारी मनोहर खंदारे, सय्यद अयुब सय्यद रसुल, बासंबा गावचे सरपंच बाजीराव घगे व समस्त गावकरी यांनी तसेच अन्नपूर्णा माध्य. विद्यालय, बासंबा येथील स्टाफने आणि सर्व तलाठी तसेच तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तलाठी अशोक केंद्रेकर यांनी केले. समाधान शिबिराचा अंदाजे 1100 लोकांनी लाभ घेतला.
टिप्पणी पोस्ट करा