जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार पोलीस अधीक्षक राकेश कलासागर ...!!



जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येणार : वाढते अपघाताला आळा घालण्यासाठी व वाहनाना शिस्त लावण्यासाठी सुरक्षा अभियान राबविण्यात येणार

हिंगोली प्रतिनिधी 
18जून 2022
जिल्हा पोलिस पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा नविन उपक्रम हाती घेतला आहे. वाढते अपघात टाळण्यासाठी व वाहनाना शिस्त लावण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी पोलिस दलाच्या माध्यमातुन जननीच्या यशस्वी कामगिरीनंतर आता रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. 


राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गावरील हिंगोली जिल्हयात अपघाताची मालिका सुरु आहे. अनेकांना आपले प्राण मुकावे लागले. यामध्ये वाहन चालकाचा निष्काळजीपणा तेवढाच कारणीभुत आहे. वाढते अपघात रोखण्यासाठी जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी पोलिस दलाच्या माध्यमातुन जिल्हाभरात रस्ते सुरक्षा अभियान राबवुन वाढते अपघात व वाहन चालकांना शिस्त घालण्यासाठी नविन उपक्रम हाती घेतला आहे. पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार दि.१७ जुन रोजी पोलिस मुख्यालयात बैठक घेतली. या बैठकीला अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्यासह आरटीओ व इतर वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये रस्ता सुरक्षा अभियान राबविण्या विषयी चर्चा करण्यात आली. जननीच्या यशस्वी कामगिरीनंतर पोलिस अधिक्षक राकेश कलासागर यांनी वाढते अपघात रोखण्यासाठी तसेच सुरक्षा नियमावली जनजागृती करण्यासाठी व्यापक प्रमाणात जिल्हाभरात रस्ता सुरक्षा अभियान राबविण्याचा संकल्प केला आहे. 
 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने