चोरी व फसवणुक करून लुटमार करणारी इराणी टोळी स्थानिक गुन्हे शाखाने केली गजाआड
हिंगोली जिल्हयातील तीन गुन्हे उघडकिस, दोन आरोपींना अटक २ लाख ३८ हजार रू. चा मुददेमाल जप्त.
हिंगोली जिल्हयामध्ये बनावट माहीती देवून फसवुणक करून दागीने लुटणारी टोळीने हिंगोली जिल्हयामध्ये मागील २ वर्षापासुन काही गुन्हे केले होते. त्याबाबत अधिक माहीती अशी कि, २७/१०/२०२० रोजी फिर्यादी महीला रा.कळमकोंडा हया गांधी चौक येथे कामानिमित्य उभ्या असतांना त्यांचे जवळ अनोळखी इसम जावुन त्यांना आजी पलीकडे चोर आलेले आहेत. ते तुझे दागीने सदर महीलेस बाजुला घेवुन त्यांचे अंगावरील चांदीचे कडे पाटल्या व नगदी १ हजार रू. असा एकुन २५,९०० रु. चा मुददेमाल खोटे बोलुन घेवुन गेले होते त्याबाबत फिर्यादी महीलेच्या तक्रारीवरून पो.स्टे. हिंगोली शहर येथे
गुरनं. ४८४ / २०२० कलम ४२०, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल आहे.
तसेच दिनांक- १३/०२/२०२१ रोजी रात्री २०.३० वा. सुमारास जिजामाता नगर हिंगोली येथे फिर्यादी महीला ही घराबाहेर फिरत असतांना दोन अनोळखी इसम मोटार सायकल वर नमुद महीले जवळ येवुन त्यांना काहीही कळू न देता फिर्यादीचे अंगावरील ७ ग्रॅम सोन्याचे हार, १ तोळा २ ग्रॅम सोन्याची गहुपोत व डोरले किं. ५८,००० रू. चा मुददेमाल चोरून नेला होता फिर्यादी महीलेच्या तक्रारीवरून पो.स्टे. हिंगोली शहर येथे गुरनं. ४५ / २०२१ कलम ३७९ भादवी अन्वये गुन्हा दाखल आहे.
तिस-या घटनेत
दिनांक- २३/०५/२०२२ रोजी फिर्यादी डॉ. पवार हे हिंगोली कडुन खाणापुरकडे जात असतांना त्यांना सावरखेडा पुलाजवळ चार अनोळखी इसमांनी त्यांची गाडी थांबवुन हिंगोली येथे खुन झाला आहे. तुमच्या जिवाला धोका आहे. तुमच्या हाताच्या बोटातील अंगठया कादुन खिश्यात ठेवा असे म्हणुन फिर्यादी जवळील दोन अंगठया कागदात गुंडाळुन फिर्यादीचे खिश्यात अंगठया ठेवल्याचे भासवुन कागदामध्ये दगडे ठेवुन फिर्यादी १३ ग्रॅम चे सोन्याच्या ०२ अंगठया किं. ५५,००० रू. फसवणुक करून घेवुन गेले होते. त्याबाबत फिर्यादीचे तक्रारी वरून पो.स्टे. बासंबा येथे गुरनं भ १२१ / २०२२ कलम ४२०, ३४ भादवी अन्वये गुन्हा दाखल आहे.
अशा प्रकारे नागरीकांना बनावट व खोटी माहीती देवुन दागीने पळवुन नेणारी टोळीने गुन्हे केले होते. सदर गुन्हे करणां-या टोळी निष्पन्न करून त्यांना पकडण्यासाठी मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. मा. पोलीस अधीक्षक साहेब यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नमुद तिन्ही गुन्हयाच्या घटनास्थळ परीसर तसेच त्यांचे वर्णन व असे गुन्हे करणारे परीसरातील आरोपींबाबत माहीती घेत असतांना सदरचे गुन्हे परळी वैजनाथ येथील इराणी टोळीने केले बाबत पुरावा व गोपनीय माहीती मिळाले वरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परळी वैजनाथ येथुन ०२ आरोपी १हुसेनी जावेद जाफरी वय २४ वर्ष रा. शिवाजी नगर इराणी गल्ली परळी २) सफीर फिरोजखान वय ३३ वर्ष रा. शिवाजी नगर, इरानी गल्ली परळी यांनी ताब्यात घेवुन त्यांना विचारपुस करता त्यांनी सदर गुन्हा पैकी पोस्टे बासंबा येथील गुरनं. १२१ / २०२२ कलम ४२०,३४ भादवी ईतर दोन आरोपी सोबत मिळून केल्याची कबुली ज्यात त्यांचे साथीदार नामे 3 तालेफ हुसेन इरानी रा. शिवाजी नगर इरानी गल्ली परळी 4 मेहमद पंजाबी पुर्ण नाव माहीत नाही रा. परळी वैजनाथ यांचे सह मिळुन केल्याचे सांगीतले आहे. नमुद अनु क. 3 व 4 आरोपी दोन्ही आरोपी फरार असुन त्यांचा शोध चालु आहे.
तपासा दरम्याण ताब्यात असलेल्या वरील आरोपी क... 1 याने आरोपी क 3 यांचे सोबत मिळुन पोस्टे हिंगोली शहर येथील गुरन 484 / 2020 कलम ४२०, ३४ भादवी व गुरनं. ४५/२०२१ कलम ३७९ भादवी गुन्हे केल्याचे सांगीतले आहे नमुद दोन्ही आरोपी कदुन खालील प्रमाणे गुन्हयातील मुददेमाल जप्त करण्यात आला आहे
1 ) 6 ग्रॅम सोन्याची व 7 ग्रॅम सोन्याची असे 13 ग्रॅम सोन्याच्या 02 अंगठया कि 55,000 रू. 2) 12 ग्रॅम सोन्याची गहुपोत व डोरले 58,000 रू. व 3) 50 तोळे चांदीचे हातातले कडे किं. 25,000 रू. असा एकुन 1,38,000 रू. दागीने व गुन्हयात वापरलेली एक यामा कंपनीची मोटार सायकल किं 1,00,000 रू. असा एकुन 2,38,000 रू. चा मुददेमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे, सहा. पोलीस अधीक्षक श्री. यतीश देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. श्री. उदय खंडेराय, स.पो.नि. सुनिल गोपिनवार, स.पो.नि. राजेश मलपिलु, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, भगवान आडे, किशोर कातकडे, राजुसिंग ठाकुर, किशोर सावंत, विठ्ठल काळे, तुषार ठाकरे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, हिंगोली यांनी केली आहे.
टिप्पणी पोस्ट करा