हिंगोलीत रस्ता सुरक्षा अभियान" सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम

रस्ता सुरक्षा अभियान" सप्ताह अंतर्गत जनजागृती कार्यक्रम व सुरक्षीत प्रवासासाठी

आवश्यक वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची मोहीम  जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांचा संयुक्त उपक्रम 

जिल्हयातील रस्ते अपघाताचे प्रमाण कमी व्हावे व नागरीकामध्ये व वाहन चालकांमध्ये वाहतुकीचे नियम व सुरक्षे बाबत जनजागृती व्हावी या व्यापक हेतुने मा. पोलीस अधीक्षक . राकेश कलासागर यांचे मार्गदर्शनात जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालय, हिंगोली यांचे संयुक्त विदयमाने दिनांक - 22/06/2022 ते 28/06/2022
 हिंगोली जिल्हयामध्ये " रस्ता सुरक्षा अभियान" सप्ताहाचे आयोजन केले असुन मा. पोलीस अधीक्षक हिंगोली याचे मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालय, यांनी दिनांक 23/06/2022 रोजी जिल्हयात विवीध ठिकाणी अॅटो व ट्रक चालकांचे बैठक घेवुन त्यांना वाहतुक नियम व सुरक्षा याबाबत सखोल मार्गदर्शन करून माहीती दिली. व मार्गदर्शक माहीती पत्रकाचे वाटप केले होते. तसेच परिवीक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक श्री. ठेंगे पोलीस स्टॉफ व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालय, यांचे स्टॉफ असे मिळून हिंगोली ते सेनगाव मार्गावर पानकनेरगाव पॉइंट, नरसी स्टॅण्ड, पुसेगाव टि पाईंट, येवले शाळा सेनगाव, बेंगाळ विदयालय कोळसा, व तोष्णीवाल विदयालय या ठिकाणी रस्ते सुरक्षा व वाहतुकीचे नियमाबाबत जनजागृती केली. तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय येथे पत्रकार परीषदेत मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यानी जनजागृती करीता पोलीस विभागाकडुन तयार केलेले 04 शॉर्ट फिल्मचे प्रसारण ही केले होते.
 दिनांक- 24/06/2022 रोजी " रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत हिंगोली शहरामध्ये शहर पोलीस स्टेशन यांनी एनसीसी विदयार्थी यांचेसह शहरातील प्रमुख चौकांमध्ये व रहदारीच्या मुख्य ठिकाणी एन.सी.सी. विदयार्थी यांचे हातात हेल्मेटचा नेहमी वापर करावा, दारू पिवुन वाहन चालवु नये, वाहन चालवतांना मोबाईलचा वापर करू नये, संयम पाळा अपघात टाळा असे विवीध आकर्षक जनजागृतीपर संदेश असणारे फलक घेवुन विदयार्थी उभे होते. ते नागरीकांचा व वाहन धारकांचे लक्ष वेधुन घेत होते. तसेच " रस्ता सुरक्षा अभियान" सप्ताह वेळापत्रका प्रमाणे आज रोजी वाहनांवर रिफ्लेक्टर लावण्याची कार्यवाही होती. सुरक्षीत प्रवासासाठी वाहणांवर आवश्यक तेथे रिफ्लेक्टर असणे अत्यंत आवश्यक आहे तेव्हा आज जिल्हयातील सर्व पोलीस स्टेशन कडुन मोठया प्रमाणात मुख्य महामार्ग व रहदारीच्या रस्त्यावरील वाहनांवर आवश्यक ठिकाणी रिफ्लेक्टर लावण्याची कार्यवाही केली व वाहनांवर रिफ्लेक्टर लावुन पोलीसांनी सुरक्षीत प्रवासाचा संदेश दिला. •नागरीकांनीही वाहतुकीचे नियम पाळुन जिल्हा पोलीस विभाग व उपप्रादेशिक परीवहन अधिकारी कार्यालय हिंगोली यांचे संयुक्त विदयमाने राबवित असलेल्या रस्ता सुरक्षा अभियानास सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने