अखेर हळदवाडी गाव रस्ता कामाला सुरुवात...!
महाराष्ट्र 24 न्यूज प्रतिनिधी
हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव गट ग्रामपंचायत असलेल्या हळदवाडी या पन्नास ते साठ घरे असलेल्या गावाला मागील स्वातंत्र्य काळापासून पक्का रस्ता नसल्याने येथे जाण्यासाठी प्रशासनाने रस्ता उपलब्ध करून देण्यासाठी येथील ग्रामस्थांकडून हिंगोली जिल्हा कचेरी समोर ता.१ जून पासून बेमुदत उपोषण करण्यात आले होते.
सदरील उपोषणाला आजी व माजी आमदार व जिल्ह्यातील सर्व सामाजिक राजकीय संघटनेचे प्रतिनिधी यांनी उपोषणस्थळी भेट देऊन जाहिर पाठिंबा दर्शविला होता
तीन दिवसांच्या उपोषणानंतर अखेर जिल्हा प्रशासनाच्या वतीने लवकरच हळदवाडी गावाला रस्ता उपलब्ध करून देण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर उपोषण सोडण्यात आले होते.
प्रशासनाच्या लेखी आश्वासनाप्रमाणे ता.६ जून रोजी येथील वैजापूर पांदण रस्ता मार्ग ते हळदवाडी या रस्त्याची तहसील कर्मचारी यांनी पाहणी करून सदरील ३३ फुट रुंदी रस्त्यास मंजुरी देण्यात आली होती.तर ता.७ जून रोजी मंगळवारी सदरील रस्त्याच्या कामाचा नारळ फोडून कामाची सुरुवात देखील करण्यात आली आहे.
यावेळी डाॅ. रमेश शिंदे, आसिफखान पठाण, गीताबाई गाडे, शाहिन पठाण, अब्दुल रहिम, संतोष पातळे, बंडु गुगळे, पांडुरंग गुगळे, मारोती गुगळे, नामदेव गाडे, रुख्मिणा गुगळे , सरस्वती शिंदे, सुभिद्रा टेकाळे, इंद्रायणी काळे, भाग्यश्री गुगळे, आदि ग्रामस्थ महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा