पक्षानी केलेल्या कामाची माहिती जनतेला सांगणार-दिलीप चव्हाण
हिंगोली प्रतिनिधी
भाषणाच्या माध्यमातुन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा तेविसावा वर्धापन दिन दि.१० जुन रोजी होणार आहे. मागील २२ वर्षात पक्षाकडून झालेल्या कामाचा लेखाजोखा सांगणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
येथील शासकीय विश्रामगृहात बुधवार दि.८ जुन रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण, माजी जि.प.उपाध्यक्ष अनिल पतंगे, मनिष आखरे, संजय दराडे यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलतांना चव्हाण म्हणाले की, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षानी मागील २२ वर्षाची वाटचाल त्यात पाच वर्षे विरोधी पक्ष म्हणुन काम केले. तर महाविकास आघाडी स्थापन झाल्यावर पक्षाने कोरोना परिस्थितीवर मात करण्यासाठी काम केले आहे. राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टतर्फे फेस सिल्ड, सॅनिटायझर, माक्स वाटप, समाजातील गरजु व कोरोना काळात पालकत्व हारपलेल्या मुलांचा शिक्षणाचा खर्च ट्रस्टमार्फत उचलण्यात आला होता. सामाजिक संस्थांनी केलेले वाटप व राज्यात अतिवृष्टीमुळे झालेले विविध ठिकाण, वैद्यकीय व शेती, आर्थिक मदत करण्यात आली. राज्यमंत्र्यांच्या खात्यामार्फत घेण्यात आलेले निर्णय व पुर्णत्वास नेलेली कामे व धोरणात्मक निर्णय यांची माहिती दि.१० जुन रोजी जनते समोर व कार्यकर्त्यांसमोर मांडणार आहेत. महागाईच्या झळा सामान्य जनतेला बसत असलेल्या पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस, सीएनजी गॅस याचबरोबर जिवन आवश्यक वस्तुचे भाव केंद्र शासनाच्या दुर्लक्षणामुळे गगणास भिडले. त्यामुळे सामान्य जनता त्यात होरपळुन निघत आहे. याकडे केंद्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नसुन पिक्चर प्रोमोशन वा जातीवादी मुद्दे समोर आणुन जनतेची दिशाभुल कसे करीत आहेत हे समजावुन भाषणातुन सांगणार आहेत. ओबीसी आरक्षणा संदर्भात इम्पिरिकल डाटा केंद्र सरकारकडे असुनही त्यांनी दिला नाही. तरीही महाविकास आघाडी विरोधात जाणीवपुर्वक भारतीय जनता पार्टीकडून अपप्रचार करत आहेत. ही सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडण्यात येणार आहे. शेती संदर्भात खताच्या किंमतीमुळे हैराण झालेला शेतकरी त्यातच आता शेतकर्यांच्या १० लाखावरील उत्पनावर केंद्र सरकार कर लावण्याच्या तयारीत असल्याचेही सांगण्यात येणार आहे.
केंद्र सरकारने महाराष्ट्र शासनाला जीएसटी परतावा म्हणुन काही प्रमाणात निधी नुकताच दिला आहे. परंतु मागील वर्षी मागीतलेला निधी केंद्र सरकारकडून आता मिळाला आहे. परंतु मोठी रक्कम विकास कामासाठी राज्यात येणे बाकी आहे हे जनतेला समजावुन सांगणे केंद्र सरकारकडून महाराष्ट्र राज्याला वारंवार विनंती करुन देखील अयोग्य वागणुक देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून कशाप्रकारे लक्ष विचलीत करण्यात येते या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर जिल्हयातील संघटन मजबुत करुन बुथ अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संघटनतेतील प्रलंबित नियुक्त्या, पक्षवाढीसाठी मार्गदर्शन व गट-तट एकत्र आणण्यासाठी कार्यकर्त्यांना योग्य असे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टिप्पणी पोस्ट करा