पालक मेळाव्यात उत्कृष्ट खेळाडूचा सत्कार

येळेगाव तुकाराम येथे दिनांक     08.07.2022 रोज शुक्रवार सकाळी ठीक 11.30 वाजता जिल्हा परिषद प्रशाला  वतीने  विद्यार्थी पालक मेळावा संपन्न झाला. या पालक मेळाव्याचा मुख्य उद्देश म्हणजे मुलांचा वयोगट  06 ते 16 वर्ष निवडलेला, क्रीडा संदर्भ व कौशल्य शिक्षण संदर्भ मुलांचा विकास व भविष्य कशाप्रकारे घडवता येईल, कार्यक्रमाला उपस्थित झालेले माननीय. कृष्णा पाटील जरोडेकर, दिगंबर कापसे, समद आमोदी सर यांनी चांगल्या प्रकारे मार्गदर्शन केले. नुकत्याच नेपाळ येथे कबड्डी सामन्यात विदर्भ अकोला संघातून उषा  पवार, उज्वला  काळे  व सोबत नामदेव  रणवीर प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यांनी दुसरा क्रमांक पटकावून, ट्रॉफी व मेडल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे,प्रमाणपत्र मिळवले. त्यांचा येथे आयोजित पालक मेळाव्यात सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला उपस्थित असलेले जिल्हा परिषद शाळेचे व प्राथमिक शाळेचे दोन्ही मुख्याध्यापक व सर्व शिक्षक वर्ग, माननीय.सरपंच माधव काळे, ग्रामपंचायत सदस्य सुदर्शन पतंगे, संदीप कवाने, माजी सरपंच गणेशराव काळे, इंडियन आर्मी चे माननीय किसना काळे, रूपाली शिंदे, पालक वर्ग, विद्यार्थी विद्यार्थिनी, संदीप पवार उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा. खाडे सर यांनी केले.
पालक मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विशेष उपस्थिती दिसून आली 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने