वसमत शहरात
वाहकतुकीस अडथळा; १७ ऑटोचालकांवर गुन्हे
महाराष्ट्र 24 न्यूज
न्यूज नेटवर्क
वसमत : शहरातील बसस्थानक परिसरात ऑटो चालकांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत समस्या निर्माण करताच पोलीस प्रशासनाने दखल घेतली. तीन दिवसांत १७ ऑटो चालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल केले. असून ऑटो चालकांचे आता आवसांन गळाले आहे
वसमत बसस्थानक परिसरात नांदेड येथील व शहरातील ऑटोचालक बेशिस्तपणे वाहतूक करीत आहेत. महिनाभरापासून त्यांना वाहतूक समस्या निर्माण करण्यात येऊ नये, याबाबत समज दिली जात होती
काही ऑटोंवर दंडात्मक कारवाईही केली आहे. वसमत ते परभणी मार्गावर ऑटोचालक वाहतूक समस्या निर्माण करणे सुरूच आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे,
यापुढेही कारवाई सुरूच राहणार....
वाहतूक समस्या निर्माण करणाऱ्या ऑटो चालकांत नांदेड येथील संख्या जास्त आहे. त्यांना वारंवार सांगून देखील काहीच फरक पडत नाही. अखेर १७ ऑटो चालकांना ताब्यात घेत त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल केले. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ऑटोंवर कारवाई सुरुच राहणार आहे. चंद्रशेखर कदम, पोलीस निरीक्षक, शहर ठाणे, वसमत यांनी सांगितले
सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार बाबासाहेब खार्डे, कृष्णा चव्हाण, शंकर हेंद्रे आदींनी १ ते ३ जुलै दरम्यान १७ ऑटोचालकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. असल्याने
ऑटो चालकांचे अवसान गळाले आहे
टिप्पणी पोस्ट करा