*हर घर तिरंगा हर घर बुस्टर डोस* जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे प्रतिपादन हिंगोली दिनांक 12 आज रोजी सकाळी सात वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समोर शहरांमध्ये भव्य तिरंगा प्रभात फेरी चे उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी यांनी हर घर तिरंगा मोहीम राबवत असताना घरोघरी प्रत्येकाने कोविड-19 बूस्टर डोस घेण्याचे आवाहन केले. आजादी का अमृत महोत्सव 75 वर्षे साजरी करत असताना दिनांक १३ १४ १५ या दिवशी प्रत्येक घरी राष्ट्रध्वज तिरंगा सन्मानाने लावायचा आहे यासाठी नगरपालिका तहसील कार्यालय या ठिकाणी ध्वज उपलब्ध आहे सर्व शासकीय निम शासकीय कार्यालयांनी ध्वज संहितेचे पालन करत वरील दिवशी ध्वजारोहण करायचे आहे असा संदेश दिला प्रभात प्रभात फेरीमध्ये सहभागी योग विद्या धाम हिंगोली तालुका आरोग्य अधिकारी हिंगोली तहसीलदार हिंगोली हरी ओम योगा ग्रुप हिंगोली ज्याएंट ग्रुप ऑफ हिंगोली जिल्हा वकील संघ जिल्हा शिक्षक संघटना जिल्हा आरोग्य अधिकारी आशा वर्कर संघटना व इतर सहयोगी संघटना यांनी प्रभात फेरी द्वारे जनजागृती केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले व पुढील कार्यालय शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर जिल्हा लसीकरण अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर तहसीलदार नवनाथ वगवाड गटविकास अधिकारी बोथी कर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे योग विद्याधामचे रत्नाकर महाजन ज्यायंट ग्रुपचे अध्यक्ष डॉक्टर संजय नाकाडे संजय खिल्लारे एलआयसी चे सुधाकर महाजन प्रदीप आंधळे रवींद्र भालेराव पंजाब गायकवाड मारुती सोलापूर गणेश डोके आरोग्य कर्मचारी अशा स्वयंसेविका मोठ्या संख्येने उपस्थित होते
टिप्पणी पोस्ट करा