उध्दव ठाकरेंसोबत सहानुभूती दाखविणारे माजी संपर्क प्रमुख शिंदे गटात
• हिंगोली दि.१७ : कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर हे शिंदे गटात दाखल झाल्यानंतर हिंगोली शिवसेनेचे संपर्कप्रमुख यांनी थेट उद्धव ठाकरे यांच्याशी कार्यकर्त्याचे संभाषण घडवून, शिवसैनिकांना दिलासा देण्याचे कार्य केले. मात्र बबनराव थोरात यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी दिल्यावर आनंदराव जाधव शिंदे गटात गेले.त्यामुळे सहानुभूती ही कशा साठी होती, अशी चर्चा होत आहे.
आमदार बांगर यांनी शिंदे गटात गेल्यावर पक्षाच्यावतीने जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक लावण्यात आली होती.या बैठकीत खुद्द उद्धव ठाकरे यांनी तत्कालीन संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्या दूरध्वनी वरून पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला होता. मात्र बांगर यांच्यानंतर खासदार हेमंत पाटील यांनीही शिंदे गटाचा रस्ता धरल्याने जिल्ह्यात पोकळी निर्माण झाली. माजी खासदार सुभाष वानखेडे व विनायक भिसे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. दरम्यान संपर्क प्रमुख पदाची जबाबदार ही माजी संपर्क प्रमुख बबनराव थोरात यांना देण्यात आली. यावेळी दोन्ही संपर्क प्रमुखांच्या उपस्थितीत माजी खासदार वानखेडे व भिसे यांचा प्रवेश सोहळा मातोश्रीवर पार पडला. मात्र जिल्ह्याची जबाबदारी बबनराव थोरात यांच्यावर देताच कालचे संपर्कप्रमुख आनंदराव जाधव आज शिंदे गटात दाखल झाले. शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख आणि वसमत तालुक्याचे तालुकाप्रमुख राजू चापके यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने शिवसैनिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. त्यामुळे लवकरात लवकर जिल्हाप्रमुख पदाची धुरा एखाद्या निष्ठावंत शिवसैनिकांच्या खांद्यावरती द्यावी अशी मागणी शिवसैनिकांच्या वतीने केली
यापुढेही शिंदे गटात इन्कमिंग सुरूच राहील खासदार हेमंत पाटील यांनी महाराष्ट्र 24न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा