अपंग तरुणीवर बलात्कार नारा धमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

अपंग तरुणीवर बलात्कार नारा धमाल पोलिसांनी ठोकल्या बेड्या 


महाराष्ट्र 24 न्यूज
20 ऑगस्ट 2022


हिंगोली तालुक्यातील बेलवाडी येथे घरात एकटी असल्याचा गैरफायदा घेत अपंग तरुणीवर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शनिवारी ता. 20 पहाटे हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्यास अटक केली आहे.

घटनेची सविस्तर माहिती अशी की बेलवाडी येथे एक 19 वर्षीय  अपग मुलगी तिच्या आई, वडिलांसोबत राहते. शुक्रवारी तिचे आई, वडिल शेतात कामासाठी गेले होते तर ती मुलगी घरात एकटीच होती. या संधीचा गैरफायदा घेत गावातील मोतीराम मरीबा कांबळे या नराधमाने दुपारी साडेतीन वाजता मुलगी एकटी असल्याचे पाहून तिच्या घरात प्रवेश केला. त्यानंतर मुलीवर बळजबरीने अत्याचार केला अन तेथून पळ काढला. यावेळी मुलगी मदतीसाठी ओरडत होती मात्र दुपारच्या वेळी सर्व शेतात गेल्यामुळे तिच्या मदतीसाठी कोणीही आले नाही.

दरम्यान, सायंकाळच्या सुमारास तिचे आई, वडिल शेतातून घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबियांनी तिला घेऊन थेट हिंगोली ग्रामीण पोलिस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.यावरून पोलिसांनी मोतीराम कांबळे याच्या विरुध्द अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, पोलिस निरीक्षक आर. एन. मळघने, उपनिरीक्षक संतोष मुपडे, एस. जी. केंद्रे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी अवघ्या काही वेळातच आरोपीला अटक केली आहे. असून पुढील तपास
पोलीस अधीक्षक राकेश कलासागर
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मळघणे व पोलीस उपनिरीक्षक संतोष मुपड हे करीत आहेत 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने