खेळामुळे ताणतणाव कमी होतो मुख्याधिकारी संजय दैन
२१वी हिंगोली जिल्हा पोलीस क्रिडा स्पर्धा - २०२२ संपन्न "
संत नामदेव पोलीस किडा मैदान, हिंगोली येथे पार पडल्या. सदर क्रिडा स्पर्धेमध्ये १) पोलीस उपविभाग हिंगोली शहर, २) पोलीस उपविभाग हिंगोली ग्रामीण, ३) पोलीस उपविभाग वसमत व ४) पोलीस मुख्यालय, हिंगोली अशा चार गटातुन (९५) महिला व पुरूष अंमलदार यांनी सहभाग घेतला होता. नमुद दोन दिवसामध्ये व्हॉलीबॉल, फुटबॉल असे सांघीक खेळ व १०० मिटर धावणे, गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक असे वैयक्तीक खेळ या प्रकारामध्ये क्रिडा स्पर्धा घेण्यात आल्या
. दि.२४.०८.२०२२ रोजी १७.०० वा. नमुद २१व्या हिंगोली जिल्हा पोलीस किडा स्पर्धा - २०२२ समारोप कार्यक्रम आयोजीत केला होता. सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणुन मा.श्री संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली यांची तसेच मा. श्री एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली, मा.श्री संदिपसिंग गिल, समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क.१२ हिंगोली, मा. श्री यशवंत काळे, अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली, मा. श्री यतीश देशमुख, सहायक पोलीस अधीक्षक, हिंगोली, मा. श्री उमाकांत पारधी, उपविभागीय अधिकारी हिंगोली, मा. श्री नागनाथ वगवाड, तहसीलदार, हिंगोली, मा. श्री वैजनाथ मुंढे, पोलीस निरीक्षक, पोलीस कल्याण शाखा, हिंगोली यांची प्रमुख उपस्थीती होती. कार्यक्रमात मान्यवरांना मानवंदना दिल्यानंतर प्रमुख अतिथींच्या उपस्थीतीत पुरूष व महिला अंमलदारांचे १०० मिटर धावणे स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच मागील दोन दिवसात झालेल्या वरील स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व बक्षीस देवुन गौरविण्यात आले. उपस्थीत खेळाडुंना मा. श्री संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद हिंगोली व मा.श्री एम. राकेश कलासागर, पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन डॉ. श्री. विजयकुमार निलावार यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मा. श्री यशवंत काळे, अपर पोलीस अधीक्षक यांनी , मानले
टिप्पणी पोस्ट करा