अनैतिक संबंधास विरोध केल्याने पत्नीस बेधम मारहाण;पतीवर गुन्हा

अनैतिक संबंधास विरोध केल्याने पत्नीस बेधम  मारहाण;पतीवर गुन्हा

महाराष्ट्र 24 न्यूज
26 अगस्ट 2022

हिंगोली तालुक्यातील सागद येथील पतीचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने पत्नीने विरोध केल्यामुळे तिला बेधम मारहाणं करून तिचा छळ केल्याने पतीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रकाश बळीराम खिल्लारे रा. सागद ह.मु. औसरी खु. ता.आंबेगाव जि. पुणे याचे एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याने त्याच्या

पत्नीने अनैतिक संबंधास विरोध केल्यामुळे तू हा विरोध का करतेस या कारणातून एप्रिल २०१८ पासून जानेवारी २०२२ या दरम्यानच्या कालावधीत औसरी पुणे व माहेरी कलगाव येथे तिला शिवीगाळ करून थापड बुक्याने मारहाण तसेच शारीरिक व मानसिक छळ केल्याने हिंगोली ग्रामीण पोलिसात २४ ऑगस्टला दिलेल्या फिर्यादीवरून प्रकाश खिल्लारे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास अमितकुमार जाधव हे करीत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने