*मौजे कानडखेडा बुद्रुक येथे 5 टक्के दिव्यांग कल्याण निधीचे वाटप* .
हिंगोली तालुक्यातील कानडखेडा बु. येथे बऱ्याच दिवसापूर्वी दि. 26/09/ 2022 रोजी ग्रामपंचायतच्या वतीने पाच टक्के अपंग कल्याण खर्च अंतर्गत गावातील सर्व दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप करण्यात आले.त्यावेळी ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. सुलोचना रामेश्वर भालेराव, उपसरपंच. सौ. दैवशाला समाधान पठाडे, ग्रामपंचायतचे ग्रामसेवक श्री. बी. टी. इंगोले व सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते धनादेशाचे वाटप करण्यात आले.
त्याबद्दल या नंतर प्रत्येक वेळी दिव्यांग बांधवांना निधीचे वाटप नेहमी करण्यात येईल असे आश्वासन ग्रामसेवक बी. टी.इंगोले यांनी बोलताना दिले.
त्यावेळी गावातील नागरिकांनी व सर्व दिव्यांक बांधवांनी समाधान व्यक्त केले.
टिप्पणी पोस्ट करा