लग्नासाठी मुलीचा हात मागता दिला नकार; संतापलेल्या भाच्याने मामाची केली हत्या. मामा भाच्याच्या नात्याला फासणारी घटना चाबरा येथे उघडकीस आली लग्नासाठी मुलीचा हातमागल्याने मामाने नकार दिल्याने मामाचा राग मनात ठेवून हादगाव तालुक्यातील चाबरा येथील दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी घडली होती याप्रकरणी आरोपी भाचा एकनाथ जाधव वय 19 वर्ष याला मराठा पोलिसांनी तीन दिवसाच्या आता अटक केली. हदगाव तालुक्यातील चाबरा येथे दिनांक 9 सप्टेंबर 2022 रोजी बालाजी दिगंबर काकडे वय 45 वर्षे व्यवसाय मजुरी हे नेहमीप्रमाणे आपल्या घरातील वसरीत झोपले असता रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांच्यावर कुराडीने प्राण घातक हल्ला करण्यात आला तेव्हा बालाजी काकडे यांना नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते दरम्यान उपचार सुरू असताना बालाजी काकडे यांचा मृत्यू झाला ही घटना मराठा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती सदर प्रकरणी मराठा पोलीस ठाण्याचे सपोनी विनोद चव्हाण तुळशीराम चिठ्ठेबाग मधुकरराव मधुकर पवार रावसाहेब देशमुख कृष्णा यादव आनंदा वाघमारे यांनी गुप्त हिरांना कामाला लावून त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार आणि संशयावरून एकनाथ बंडू जाधव वय 19 वर्षे राहणार चाबरा याला ताब्यात घेतले असता एकनाथ जाधव यांनी आपल्या स्वतःच्या मामाची खुनाची कबुली दिली, असल्याचे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले. लग्नासाठी मुलगी दिली नाही म्हणून केली हत्या. रोजगारासाठी रोडगी येथील बालाजी काकडे हे गेल्या पन्नास वर्षांपूर्वी चाबरा येथे स्थायिक झाले त्यांना चाबरा येथे चांगला रोजगारही मिळत असे सर्व काही चांगले सुरू असताना त्यांची बहीण वंदनाबाई बंडु जाधव राहणार सांडस मुळगाव येथील असून त्यांनाही तिकडे काही रोजगार मिळत नव्हता म्हणून त्या सुद्धा आपल्या कुटुंबासहित चाबरा येते स्थायिक झाल्या होत्या बालाजी काकडे यांना दोन मुली होत्या त्यातील एका मुलीचा हात आरोपी भाचा एकनाथ जाधव यांनी मागितला असता तू काहीच काम करत नाहीस असे म्हणत मामाने आपल्या मुलीचे लग्न तुझ्यासोबत लावून देत नाही म्हणत नकार दिला मामाचा राग मनात धरून खून केल्याची कबुली एकनाथ जाधव यांनी दिली यानंतर पोलिसांनी तपासाची चक्री फिरवली व तीन दिवसाच्या आत आरोपी एकनाथ बंडू जाधव व 19 वर्षे व्यवसाय बेगारी यांना तीन दिवसाच्या आत ताब्यात घेतले.
टिप्पणी पोस्ट करा