गोंडाळा गावात मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी केल्याचा गुन्हा उघड...!



गोंडाळा गावात मंदिरातील दानपेटी फोडून रक्कम चोरी केल्याचा गुन्हा उघड...!
महाराष्ट्र 24न्यूज
 नेटवर्क15 सप्टेंबर 2022
हिंगोली 
सेनगाव तालुक्यातील मौ. गोंडाळा गावात प्रसिध्द श्री.महादेवाचे वंशेश्वर मंदीर असुन दि.१०ते ११ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरटयांनी सदर मंदीरातील ओटयावरील लोखंडी दानपेटी चोरून नेवुन अंदाजे २५ ते ३० हजार रुपये चोरुन नेल्याप्रकरणी औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सायबर सेलच्या सहकार्याने २ दिवसात सदरचा गुन्हा उघड करुन ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांनी अटक केली.  
मौ. गोंडाळा गावात प्रसिध्द श्री. महादेवाचे वंशेश्वर मंदीर असुन दि.१०ते ११ सप्टेंबर दरम्यान अज्ञात चोरटयांनी लोखंडी दानपेटी चोरून नेवुन त्यांचे कुलुपकोडा तोडुन त्यामधील देणगी स्वरूपात असलेली अंदाजे २५,००० ते ३०,००० रू. चोरून नेले होते. त्याबाबत दि.१२ सप्टेंबर रोजी पोलीस स्टेशन औंढा नागनाथ येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हा तात्काळ उघड करण्याबाबत पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिला होता. त्यावरून स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनात तपास पथकाने घटनास्थळ व परीसरात जावुन तपास केला तसेच गोपनीय यंत्रणेच्या व सायबर सेल यांचे यांचे मदत घेवुन अवघ्या २ दिवसात सदरचा गुन्हा उघड केला. सदरचा गुन्हा सेनगाव येथे राहणारे ३ अल्पवयीन विधीसंघर्षग्रस्त बालकांनी मिळुन केल्याचे निष्पन्न झाले. या ३ विधीसंघर्षग्रस्त बालकांकडुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हयातील मंदीरातील दानपेटी तोडुन चोरून नेलेले नगदी रू. चलणी नोटा व चिल्लर कॉईन असे एकुण २४,७२५ रू. आरोपींनी गुन्हयात वापरलेले व दोन ऍन्ड्राईड मोबाईल किं. १५,००० रू. असा एकुण ३९,७२५ रू. चा मुददेमाल व गुन्हयात मंदीरातील दानपेटी तोडण्यासाठी वापरलेले लोखंडी रॉड जप्त करण्यात आले आहे. गुन्हयाचा पुढील तपास औंढा नागनाथ पोलीस करीत आहेत.सदरची कार्यवाही मा.पोलीस अधीक्षक एम.राकेश कलासागर, अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय, सहा.पोलीस निरीक्षक राजेश मलपिलु, सहा.पोलीस निरीक्षक सुनिल गोपीनवार पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री कांबळे, पोलीस अंमलदार भगवान आडे, सुनिल अंभोरे, नितीन गोरे, राजुसिंग ठाकुर, ज्ञानेश्वर सावळे, आकाश टापरे, ज्ञानेश्वर पायघन, शेख जावेद, प्रशांत वाघमारे, सुमित टाले, प्रकाश झाडे यांनी केली.


Post a Comment

थोडे नवीन जरा जुने