देवेंद्र फडणवीस आज नांदेडच्या पालकमंत्र्यांची जबाबदारी पार पाडणार; मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त विसावा उद्यानात त ध्वजारोहण फडकवणार. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त आज दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नांदेड येथे शासकीय ध्वजारोहण विसावा उद्यान येथे करणार आहेत. दरवर्षी शासकीय ध्वजारोहण हे जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या हस्ते होत होता पण यावर्षी कोणत्याही जिल्ह्याला पालकमंत्री नसल्याकारणाने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडवणीस हे शासकीय ध्वजारोहण नांदेड येथे पार पाडतील. देश स्वातंत्र्य झाल्यानंतरही नांदेड सह मराठवाडा कर्नाटक चा भाग तत्कालीन हैदराबाद संस्थानातच होता, देश स्वतंत्र झाल्यानंतरही तब्बल 13 महिने चाललेली निजामशाही अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी संपवून मराठवाड्यात अखेरचे पर्व संपून मराठवाड्यात अमृत महोत्सवी दिनांक 17 सप्टेंबर हा तसा मराठवाड्याचा खराखुरा स्वातंत्र्य दिन. मराठवाड्याच्या 74 व्या मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने उद्या दिनांक 17 सप्टेंबर 2022 रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण होणार आहे. माता गुजरी विसावा उद्यान येथे सकाळी साडेआठ वाजता हुतात्मा स्मारक स्मृति स्तंभास मानवंदना व पुष्पचक्र अर्पण केले जाईल. यानंतर नऊ वाजता राष्ट्रध्वज वंदनांचा मुख्य शासकीय समारंभ होईल. या समारंभास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आव्हान जिल्हा अधिकारी खुशाल सिंग परदेशी यांनी केले आहे. समारंभासाठी निमंत्रितांनी पोशाखात वीस मिनिटे अगोदर आसनस्थान व्हावे, सुरक्षेच्या दृष्टीने बॅग किंवा तत्सम वस्तू सोबत आणून नये. यात मुख्य शासकीय समारंभास सर्वांना उपस्थित रहावे यासाठी तर सर्व कार्यालय, संस्था त्यांच्या ध्वजारोहणाचा कार्यक्रम सकाळी7:30 च्या अगोदर किंवा सकाळी9:30 च्या नंतर करण्याचे आदेश नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी खुशाल सिंग परदेशी यांनी दिले आहेत. प्लास्टिकचे ध्वज वापरले जाऊ नये म्हणून सर्वच यंत्रणांना दक्ष राहण्याच्या सूचना व आदेश दिले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा