नर्सी (नामदेव) येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न
गुरुद्वारा जन्मस्थान शिरोमणी भगत बाबा नामदेव जी नर्सी(नामदेव) व शिवज्योत फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दि :- 17/09/2022. राविवार रोजी -मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचे औचित्य साधुन मोफत अरोग्य सेवा तपासणी व रोगनिदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. शिबीराचे उद्घाटन गुरुद्वाराचे प्रमुख
जत्थेदार बाबा डॉ.स.हरचंद सिंगजी राय यांच्या हस्ते करण्यात आले. या शिबीराला हिंगोली जिल्हातील प्रसिद्ध डॉ.श्री.जनार्दन बोथीकर (एम डी मेडीसीन, हृदयरोग तज्ञ, मधुमेह तज्ञ) यांनी मोठ्या संख्येत रुग्णांची मोफत तपासणी करुण त्यांचावर औषधोपचार केले. शिबीराला यशस्वी करण्या साठी आर्केटेक्ट श्री. उमेश मेकर. श्री. शिवशंकर दिघडे,स. सुखबिर सिंग अलग,श्री.गणेश गरड,श्री.रितेश अग्रवाल, श्री.मनिष जयपाल सर,श्री.सुनिल जाधव,डॉ.प्रल्हाद वाघमारे, डॉ.केशव वाघमारे,श्री.देशमुख साहेब,श्री.गोविंद बियाणी,सज्जाद भाई व गुरुद्वारा समीती व कर्मचारी यांनी रूग्ण सेवेसाठी परिश्रम घेतले
टिप्पणी पोस्ट करा