महाराष्ट्र 24 न्यूज
23 सप्टेंबर 2022
मुंबई तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मॉलमध्ये वाईन विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, जनतेच्या आणि भाजपाच्या विरोधानंतर हा निर्णय मागे घेण्यात आला होता. दरम्यान, राज्यातील सत्ताबदलानंतर शिंदे - फडणवीस सरकारने पुन्हा मॉलमध्ये वाईन विक्री सुरू करण्याचे संकेत दिले आहेत. मॉलमधली. वाईन विक्री ही शेतकऱ्यांच्या हिताची असून याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या चर्चा करणार असल्याची
उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार
माहिती उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. मॉलमध्ये वाईन विक्रीचा मसुदा जेव्हा `जनतेसाठी खुला करण्यात आला होता आम्ही या संदर्भात लोकांची मते जाणून घेतली. जुलै महिन्याच्या अखेरीपर्यंत अनेकांनी या केल्या आहेत. त्यानुसार या निर्णयाच्या समर्थनात
आणि विरोधात किती जण आहेत, त्याचा अभ्यासं सुरू आहे. विभागाचे सचिव आणि आयुक्त यावर. • काम करत आहेत. येत्या १५ दिवसांत यासंदर्भातला अहवाल माझ्याकडे येईल, त्यानंतर मी स्वतः याचा अभ्यास करून लोकांची मते काय आहेत, हे जाणून घेतल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ.
टिप्पणी पोस्ट करा