गणेश विसर्जनादरम्यान आठ भाविकांचा मृत्यू !

गणेश विसर्जनादरम्यान आठ भाविकांचा मृत्यू ! `

हिंगोली यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, लातूर, धुळे जिल्ह्यातील भाविकांचा समावेश

महाराष्ट्र24न्यूज 
नेटवर्क 11 सप्टेंबर 2022

हिंगोली गणेश विसर्जनादररम्यान राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये किमान ८ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये हिंगोली यवतमाळ, वर्धा, बुलडाणा, लातूर, धुळे, आदी जिल्ह्यांचा समावेश आहे.


हिंगोलीतील घोटादेवी येथील गणपतीचे कयाधू नदीत विसर्जन करताना  
पुरुषोत्तम संतोष गडगिळ 
या बारा वर्षीय मुलांचा बुडून मृत्यू झाला

मांडवा येथे दोन बालकांसह तिघे बुडाले आंजी (मोठी), वर्धा: नजीकच्या मांडवा येथे गणपती विसर्जनास गेलेल्या युवकासह दोन बालकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. शुक्रवारी ९ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३० ते ४ वाजताच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली.

मांडवा गावालगत असलेल्या मोती नाल्यामध्ये गणपती विसर्जनाकरिता संदीप ज्ञानेश्वर चव्हाण (वय ३५) हा गेला होता. बंधाऱ्याजवळ गणपती विसर्जन करताना दोन लहान मुले खोल पाण्यात गेली. त्यावेळी अथर्व सचिन वंजारी (वय १२ ) आणि कार्तिक तुळशीराम बलवीर (वय ११) हे दोघे पाण्यात बुडत असल्याचे दिसल्याने संदीप चव्हाण वाचविण्याकरिता खोल पाण्यात गेला; परंतु पाण्यामध्ये गाळ असल्यामुळे मुलांसह संदीप पाण्यात बुडाला.

यवतमाळ जिल्ह्यात दोघांचा मृत्यू आर्णी (यवतमाळ) घरगुती गणपती बाप्पाचे विसर्जन झाल्यानंतर

गणपती बाप्पाची मूर्ती पाण्यात बुडाली की नाही हे बघण्यासाठी पुन्हा नाल्यातील पाण्यात गेलेल्या गोकुळ तेतर, सोपान गावंडे या २ किशोरवयीन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना काल शुक्रवार दि. ९ ला सायंकाळच्या सुमारास आर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील महागाव (कलगाव) येथे घडली. पांझरा नदीत
गणेश भक्ताचा बुडून मृत्यू नेर (धुळे) : एकीकडे संपूर्ण धुळे जिल्ह्यात मोठ्या उत्साहात गणरायाचे विसर्जन सुरू असताना दुसरीकडे मात्र गणेश विसर्जनासाठी गेलेला तरुणाचा नदीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. आनंदखेडे येथे गणेश विसर्जनादरम्यान एका तरुणाचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली त्यांना आहे. राकेश आव्हाड असे तरुणाचे नाव आहे. गणपती विसर्जनादरम्यान राकेशचा पाय घसरला आणि तो नदीत पडला. पांझरा नदीत बुडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याचे समोर आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने