सिद्धिविनायक मंडळ रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद
हिंगोली (प्रतिनिधी)-
सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. रक्तदान शिबिराचे उदघाटन मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
सिद्धीविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोलीच्या वतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. श्री गणरायांचे पुजन करुन रक्तदान शिबिराचे उदघाटन करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अप्पर पोलिस अधिक्षक यशवंत काळे, अतिरिक्त पोलिस अधिक्षक यतिश देशमुख, हिंगोली नगर पालिकेचे मुख्याधिकारी अरविंद मुढे, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ.राजेंद्र सुर्यवंशी, नगरअभियंता रत्नाकर अडसिरे, डॉ.गोपाल कदम, डॉ.स्वाती गुंडेवार, स्वच्छता निरीक्षक बाळु बांगर यांच्यासह माजी नगरसेवक, विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. या शिबिरात जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीने रक्तसंकलन केले. यावेळी रक्तपेढी वैद्यन्यायीक अधिकारी प्रदिप सोळुंके, समुपदेशक अणुराधा पथरोड, सविता वाकळे, विवेक गिरी, हरीओम दिगडे यांनी परिश्रम घेतले. यावेळी समितीचे पदाधिकारी उपस्थित होती.
टिप्पणी पोस्ट करा