हिंगोली विधानसभा मतदार संघातील तब्बल ३६५ किमीचे रस्ते होणार दर्जेदार ..!
आमदार तानाजी मुटकुळे
महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
29 सप्टेंबर 2022
हिंगोली : जिल्ह्यातील रस्ते दर्जेदार करण्याच्या आमदार तान्हाजी मुटकुळे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून जिल्हयातील तब्बल ३६५ किलोमिटरचे रस्ते दर्जेदार होणार आहेत . त्यामुळे या रस्त्यांसाठी केंद्र व राज्य शासनाचा वाढीव निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
हिंगोली जिल्हयातील काही रस्ते इतर जिल्हा मार्ग असल्यामुळे या रस्त्यांच्या दुरुस्ती व मजबुतीकरणासाठी शासनाकडून कमी प्रमाणात निधी मिळत होता. त्यामुळे रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यापुरताच निधी मिळत असल्याने वाहतुकीची अडचण कायम होती. रस्त्यांवरून होणारी वाहतुक त्या रस्तांवरील गावांची लोकसंख्या तसेच इतर बाबी लक्षात घेऊन आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी रस्त्यांची दर्जेदार होऊन त्यांचा प्रमुख जिल्हा मार्गामध्ये समावेश करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला होता. त्यानंतर
रस्त्यासाठी केंद्र व राज्य शासनाचा वाढीव निधी मिळण्याचा मार्ग झाला मोकळा
ग्रामीण मार्ग व इतर जिल्हा मार्ग दर्जाचे रस्ते प्रमुख मार्गाचा दर्जा मिळाला
सार्वजनिक बांधकाम विभागाकडे हस्तांतरीत होणार
जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागानेही या संदर्भात शासनाकडे ठराव पाठवला होता. त्यानंतर शासनाने याबाबतचे आदेश नुकतेच जामदया काढले आहेत.
यामध्ये हिंगोली जिल्हा सिमेपासून ते मन्नासपिंपरी- गुगुळपिंपरी- भगवती असा १३ किलोमिटरचा रस्ता, इंचा-पांगरी ते आजेगाव असा ६७ किलोमिटरचा रस्ता, भंडारी ते कापडसिंगी-बामणी खुर्द पर्यंतचा २२ किलोमिटरचा रस्ता, हिवरखेडा-वाघजाळी ते हाताळा ३९ किलोमिटर, भंडारी
देवकरवाडी- बाभुळगाव हाताळा - केंद्रा खुर्द ५३ किलोमिटर, शेगाव
खैरखेडा बलाना २७ किलोमिटर, आडगाव-बेलुरा माळहिवरा १२ किलोमिटर, कडती - अठरवाडी २१ किलोमिटर, लिंबाळातांडा - तांदुळवी-मकोडी २८ किलोमिटर, बरडा- लिंगदरी १० किलोमिटर, कोयळज देवाळा - डिग्रस कन्हाळे २४ किलो मिटर, कन्हेरगाव नाका
- आडगाव-फाळेगाव ३४ किलोमिटर, सरकळी - वरुडकाजी पुसेगाव - खुडज १३ किलोमिटर अंतराच्या रस्त्याचा समावेश आहे. या रस्त्यासाठी शासनाकडून निधी मिळणे सोईचे झाले असून या मार्गावर आता वाहतुक सुरळीत होणार आहे.
असे आमदार तानाजी मुटकुळे यांनी महाराष्ट्र 24 न्यूज ला बोलताना सांगितले
टिप्पणी पोस्ट करा