स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची मोठी कार्यवाही मोटार सायकल चोरांची आंतरजिल्हा टोळी पकडुन १४ मोटार सायकल जप्त एकुण ०६ मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड ७ लाखाचा मुददेमाल जप्त W 35 15/10/2022 हिंगोली शहर व जिल्हयात मागील काही महीण्यापासुन मोटार सायकल चोरीचे गुन्हे घडले होते . नमुद मोटार सायकल चोरी करणारी टोळी पकडुन मोटार सायकल चोरीचे गुन्हयांवर आळा घालण्याचे आदेश मा . पोलीस अधीक्षक हिंगोली श्री . एम . राकेश कलासागर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस दिले होते . स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली चे पोलीस निरीक्षक उदय खंडेराय यांचे मार्गदर्शनात तपास पथकाने मोटार सायकल चोरीच्या गुन्हयाचा बारकाईने अभ्यास करून गोपनिय माहितीच्या आधारे हिंगोली व नांदेड जिल्हयातील आरोपी नामे 1 ) मो . एजाज मो . अकबर वय 33 वर्ष , रा . गंगानगर , देगलुरनाका , नांदेड , ह.मु. आझम कॉलनी , हिंगोली व 2 ) शेख हकिम शेख कासीम , वय 32 वर्ष , रा.पलटन , हिंगोली यांना निष्पन्न करून नमुद आरोपींना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास केली असता त्यांनी नांदेड , हिंगोली , परभणी जिल्हयातील अनेक मोटार सायकल चोरल्याची कबुली दिली . सदर आरोपीतांकडुन विविध कंपणीच्या 14 मोटार सायकली एकुण रू . 7,00,000 / - सात लाख रू . चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . तसेच नांदेड , हिंगोली व परभणी जिल्हयातील खालील प्रमाणे गुन्हे उघड करण्यात आले आहे . 1 ) पो.स्टे . हिंगोली शहर गुरनं . 394 / 2022 कलम 379 वी 2 ) पो.स्टे . औंढा नागनाथ गुरनं . 265 / 2022 कलम 379 भादवी 3 ) पो.स्टे . वसमत शहर गुरंन 310/2022 कलम 379 भादवी 4 ) पो.स्टे . कळमनुरी गुरनं . 70 / 2020 कलम 379 भादवी 5 ) पो.स्टे . जिंतुर जि . परभणी गुरनं . 398 / 2022 कलम 379 भादवी 6 ) पो.स्टे . इतवारा जि . नांदेड गुरनं . 279 / 2022 कलम 379 भादवी नमुद आरोपींवर यापुर्वी सुध्दा नांदेड जिल्हयात घरफोडी व मोटार सायकल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असुन नमुद आरोपीतांकडुन अजुनही घरफोडी व चोरीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे . सदरची कार्यवाही मा . पोलीस अधीक्षक श्री एम . राकेश कलासागर , मा . अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री उदय खंडेराय , सपोनि सुनिल गोपीनवार , सपोनि राजेश मलपिलू , सपोनि . शिवसांब घेवारे , पोलीस अंमलदार भगवान आडे , शेख शकील नितीन गोरे , विठठल कोळेकर , राजु ठाकुर , ज्ञानेश्वर सावळे , विठठल काळे , आकाश टापरे , किशोर सांवत , चालक तुषार ठाकरे , सुमित टाले , जयप्रकाश झाडे , पारू कोटमीते , रवीना घुमनर , सुनील अंभोरे , संभाजी लेकुळे , किशोर कातकडे यांनी केली
टिप्पणी पोस्ट करा