पोलीस अधीक्षक जी श्रीधर घेणार अधिकाऱ्यांची १ नोव्हेंबरला बैठक

पोलीस अधीक्षक जी श्रीधर    घेणार    अधिकाऱ्यांची १ नोव्हेंबरला  बैठक

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क 31 ऑक्टोबर 2022

हिंगोली नुतन जिल्हा पोलिस अधिक्षक पदी जी श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर प्रथमच १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक घेणार आहेत 

राकेश कलासागर यांची बदली झाल्यानंतर जिल्हा पोलिस अधिक्षक पदाचा पदभार जी श्रीधर यांनी स्विकारला. यापूर्वीच्या कार्यकाळात प्रशासनात शिस्तप्रियता व अवैध व्यवसायीकावर करडी नजर अशी त्यांच्या कामाची कार्यपद्धती ठरली आहे. जी श्रीधर यांनी पदभार

स्विकारल्यानंतर जिल्ह्यातील अवैध धंद्यासह अवैध दारू विक्रीचे समुळ उच्चाटन करण्याचा चंग त्यांनी बांधला आहे.

जिल्हा पोलिस अधिक्षक जी श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर, प्रथमच १ नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील पोलिस अधिकाऱ्यांची गुन्हे आढावा बैठक बोलावली आहे. या बैठकीत जिल्ह्यातील विविध गुन्ह्यांचा आढावा घेऊन प्रलंबीत गुन्ह्या संदर्भातसूचना दिल्या जाणार आहेत. त्यांच्या उपस्थितीत पहिलीच बैठक होत असल्याने पोलिस अधिकारी देखील विविध बाबीची परिपूर्ण माहिती काढण्यात व्यस्त दिसून येत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने