निकृष्ट दर्जाच्या मध्यान्ह भोजनाचा आ. संतोष बांगरांकडून भंडाफोड

निकृष्ट दर्जाच्या मध्यान्ह भोजनाचा आ. संतोष बांगरांकडून भंडाफोड

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क 13 ऑक्टोंबर 2022

हिंगोली  आमदार संतोष बांगर यांनी मध्यान्ह भोजन योजनेतील गैरप्रकार पुन्हा एकदा उघड केला असून केलेल्या ..स्टींग ऑपरेशनमध्ये जळालेल्या पोळ्या, सलाडच्या नावाखाली फक्त चिरलेली गोबी व वरणामध्ये अळ्याही निदर्शनास आल्याने आ. संतोष बांगर अधिकच संतप्त झाले.

जिल्ह्यातील मध्यान्ह भोजन योजनेचा भंडाफोड यापूर्वी आमदार संतोष बांगर यांनी केल्याने राज्यात ते चांगलेच गाजले होते. संबंधित कंत्राटदारास फैलावर घेऊन आठवड्यात दिलेल्या मेनू प्रमाणे मध्यान्ह भोजन कसे काय दिले जात नाही, असा प्रश्नही त्यांनी यापूर्वी उपस्थित केला. १२ ऑक्टोबर रोजी आ. संतोष बांगर यांनी अचानक केलेल्या स्टींग ऑपरेशनमध्ये कामगारांना पुरविण्यासाठी जात असलेल्या वाहनातील मेनूची पाहणी केली असता सलाडच्या नावाखाली चिरलेली कोबी, जळालेल्या पोळ्या व डाळीमध्ये चक्क अळ्या निदर्शनास आल्या. त्यामुळे गोरगरीब मजूरांच्या जिवनाशी खेळणाऱ्या कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याची मागणी आ. संतोष बांगर हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करणार असल्याचे प्रसार माध्यमांशी त्यांनी बोलतांना सांगितले..

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने