हिंगोली कळमनुरीत झन्नामन्ना जुगारावर छापे बारा जणांवर गुन्हे दाखल
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 1 नोव्हेंबर 2022
हिंगोली नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक जी.श्रीधर यांनी पदभार स्विकारल्यानंतर अवैध धंद्यावर छापे मारण्याच्या सूचना देताच पोलिस यंत्रणेने अवैध धंद्यावर छापे मारण्यास आले. कळमनुरी हिंगोली शहरात झन्नामन्ना जुगारावर छापे मारून १२ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले
नूतन जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर हे अॅक्शनमोडवर असल्याने अवैध धंद्यावर छापासत्र . सुरू झाले आहे.
हिंगोली शहरातील महादेववाडी भागात झन्नामन्ना जुगार सुरू असल्याची माहिती पोलिस निरीक्षक पंडीत कच्छवे यांना
मिळताच त्यांनी पोलिस उपनिरीक्षक माधव जिव्हारे यांच्यासह पथकाला ३० ऑक्टोबरला रवाना केले. रात्री पोलिसांनी महादेववाडीत छापा मारताच घटनास्थळी नगदी १३०० रूपये व जुगाराचे साहित्य मिळून
याप्रकरणी हिंगोली शहर पोलिसात पोउपनि माधव जिव्हारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेख शब्बीर शेख रफीक, सय्यद मोहसीन नथूजी झगडे सय्यद नुर, फय्याज खान छोटू खान पठाण, शेख मोईन शेख खाजा रा. महादेवाडी यांच्यावर गुन्हा दाखल केला तर कळमनुरी शहरातील धोबीघाट येथील देशी दारूच्या दुकानासमोर सहाय्यक पोलिस
निरीक्षक रोयलवार यांनी तितली भवरा जुगारावर मारलेल्या छाप्यात घटनास्थळी नगदी २१४० रूपये व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी कळमनुरी पोलिसात शेख मोहमद शेख निजाम रा. जमजम कॉलनी, बारीकराव चंपती आसोले, परमेश्वर सुभाष आसोले रा. आसोलवाडी, सतिश शिवाजी जटाळे रा. जटाळवाडी, गजानन रा. माळेगल्ली, इरशादखाँ मकसूदखाँ पठाण रा. कौठा रोड वसमत, अनिल गोपाळराव सूर्यवंशी रा. शास्त्रीनगर, शेख अखिल शेख शब्बीर रा. कळमनुरी या आठ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले.
पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या बेधडक आदेशाने अनेकांचे धाबे दणाणले आहेत
टिप्पणी पोस्ट करा