स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची मोठी कार्यवाही घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास अटक, हिंगोली जिल्हयातील ०६ घरफोडीचे गुन्हे उघड १ लाख ६३ हजार मुदेमाल जप्त

महाराष्ट्र24न्यूज 
नेटवर्क 06 ऑक्टोंबर 2022

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोलीची मोठी कार्यवाही घरफोडीचे गुन्हे करणारा सराईत गुन्हेगारास अटक, हिंगोली जिल्हयातील ०६ घरफोडीचे गुन्हे उघड १ लाख ६३ हजार रू. चा मुददेमाल जप्त

मागील काही महीण्यापासून हिंगोली जिल्हयातील आखाडा बाळापुर व वसमत पोलीस स्टेशन अंतर्गत सिमावर्ती भागात तसेच सदर परीसराला लागुन असलेले नांदेड व यवतमाळ जिल्हयातील सिमावर्ती भागात घरफोडीचे अनेक गुन्हे घडले होते. सदर घरफोडी करणारे टोळीतील आरोपींना पकडण्याकरीता मा. पोलीस अधीक्षक साहेब हिंगोली यांचे आदेशाने व मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथील पथक सतत प्रयत्न करत होते. नमुद टोळीला पकडण्याकरीता नांदेड व यवतमाळ येथील पोलीस पथकही प्रयत्न करत होते. नमुद टोळीचे गुन्हयाचे कृत्य वाढतच होते त्यांना पकडुन गुन्हयांना आळा घालण्याचे आवाहन पोलीसांसमोर होते. स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल हिंगोली यांनी मागील काही दिवसापासून सतत प्रयत्न करून नमुद चोरीच्या घटनास्थळांना भेट त्यांचा अभ्यास व असे गुन्हे करणारे आरो

पी बाबत माहीती व सायबर सेल हिंगोली यांनी डम्प डाटा, सी.डी. आरयांचा अभ्यास यातुन तांत्रीक विश्लेषन व गोपनीय बातमीदार यांचे मदतीने सदरचे गुन्हे हे सोनाजी चंपती शिंदे रा. पारधी वस्ती टोकाई, बागलपार्टी याने व त्यांचे नांदेड जिल्हयातील हिमायतनगर व परीसरात राहणारे साथीदारांच्या मदतीने केल्याचे कळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बागलपा पारधीवस्ती टोकाई वस्ती येथुन सोनाजी चंपती शिंदे वय 25 वर्षे, रा. टोकाई वस्ती बागलपार्टी ता.वसमत यास ताब्यात घेवुन त्यांचेकडे सखोल तपास करता त्याने त्याचे साथीदार नामे 1. जाकी बावाजी चव्हाण रा. सोनारी ता. हिमायतनगर जि.नांदेड. 2. मागीलाल श्रीरंग राठोड उर्फ भोसले रा. हिमायतनगर जि.नांदेड 3. विकास श्रीरंग राठोड उर्फ चव्हाण रा. हिमायतनगर जि.नांदेड 4. निलेश बबरसिंग राठोड 5. दता मागीलाल राठोड उर्फ भोसले रा.नागेशवाडी ता. हिमायतनगर नांदेड 6. सतीष गणपत राठोड रा. हिमायतनगर जि.नांदेड 7. बाबुलाल भावजी चव्हाण रा. हिमायतनगर जि.नांदेड यांचे सोबत मिळुन हिंगोली जिल्ह्यातील पो.स्टे. आखाडा बाळापुर व वसमत ग्रामीण हददीमध्ये खालील गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.

1.पो.स्टे.आ.बाळापूर गुरन 288 / 2022 कलम 394,511,34 भा.द.वी. 2.पो.स्टे. आ. बाळापूर गुरन 409 / 2021 कलम 457,380 भा.द.वी. 3.पो.स्टे.आ.बाळापूर गुरन 185/2022 कलम 394,336,34 भा. द.वी. 4.पो.स्टे. आ. बाळापूर गुरन 189/2022 कलम 457,380 भा.द.वी. 5.पो.स्टे. वसमत ग्रा. गुरन 180 / 2022 कलम 394,34 भा.द.वी. 6.पो.स्टे. आ. वसमत ग्रा. गुरन 233 / 2021 कलम 457,380 भा.द.वी.

आरोपीकडे अधिक तपास करता त्याने नमुद गुन्हयातील चोरलेले नगदी रुपये व दागीने त्याचे इतर साथिदारांसोबत वाटुन घेतले असुन त्यांचे हिश्याला आलेले वर नमुद गुन्हयातील 31 ग्रॅम सोन्याचे दागीने ज्यात सोन्याचे अंगठया, कानातले रिंग, सोन्याचे पेंडाल, मणी इ. दागीने ज्यांची किंमत 1 लाख 3 हजार रूपये, सोबत गुन्हयात आरोपीने वापरलेले अॅन्ड्राईड मोबाईल किं. 10,000 रु. एक बजाज कंपनी डिस्ककव्हर मो.सा. किं. 50,000 रू. असा एकूण 1,63,000 रू. चा मुद्देमाल आरोपी कडुन जप्त करण्यात आला आहे. गुन्हयातील ईतर आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कार्यवाही मा. पोलीस अधीक्षक श्री एम. राकेश कलासागर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री यशवंत काळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. श्री. उदय खंडेराय, सपोनि सुनिल गोपीनवार, सपोनि राजेश मलपिलू, पोउपनि भाग्यश्री कांबळे, पोलीस अंमलदार संभाजी लेकुळे, भगवान आडे, सुनिल अंभोरे, शेख शकील नितीन गोरे, पाठ कुडमेथा विशाल घोळवे, राजु ठाकुर, शंकर ठोंबरे, ज्ञानेश्वर सावळे, विठठल काळे, आकाश टापरे, रविना घूमनर किशोर सांवत, ज्ञानेश्वर पायघन, चालक प्रशांत वाघमारे, सुमित टाले, रोहीत मुदीराज, जयप्रकाश झाडे, इरफान पठाण यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने