बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांचे करिता HIV/AIDS संवेदिकरण हिंगोलीत

बालविकास प्रकल्प  अधिकारी व पर्यवेक्षिका यांचे करिता HIV/AIDS संवेदिकरण हिंगोलीत  प्रशिक्षण संपन्न.

    जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्ष, जिल्हा रुग्णालय, हिंगोली तर्फे आयोजित बालविकास प्रकल्प अधिकारी व पर्यवेक्षिका यांचे करिता HIV/AIDS संवेदिकरण प्रशिक्षण जिल्हा परिषदेच्या षटकोनी सभागृहात संपन्न झाले. 
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म.बा.) श्री गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ राजेंद्र सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ शिवाजी पवार, RMO डॉ गोपाल कदम व जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री ज्ञानेश्वर चौधरी हे उपस्थित होते.
HIV/AIDS बद्दल DPO श्री ज्ञानेश्वर चौधरी यांनी सखोल प्रशिक्षण देऊन सर्व प्रशिक्षणार्थी यांनी या प्रशिक्षणाचा उपयोग हा आपल्या अधिनस्त कर्मचारी व इतर ANC यांना जास्तीत जास्त कसा करून देता हे सांगितले. तर मान्यवरांनी उपस्थितांना मार्गदर्शन करून प्रशस्तीपत्र वाटप केले.
कार्यक्रमाचे आभार व सूत्रसंचालन समुपदेशक श्री बालाजी चापाकानडे यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्री आशिष पाटील, श्री संजय पवार, श्रीमती टिना कुंदनानी, श्रीमती महानंदा साबळे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने