खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहा : भास्करराव बेंगाळ

खा. राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला हजारोच्या संख्येने  उपस्थित राहा : भास्करराव बेंगाळ

महाराष्ट्र 24 न्यूज
 नेटवर्क12 नोव्हेंबर 2022

काँग्रेसचे राष्ट्रीय युवानेते तथा खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघाल ेली भारत  जोडो यात्रा 14नोव्हेंबर रोजी हिंगोली शहरात येत असून या भारत जोडो यात्रेला सेनगांव तालुक्यातील सर्व काँग्रेस पदाधिकारी व काँग्रेस कार्यकर्त्यांनी  मोठ्या संख्येने उपस्थित राहावे


असे आवाहन काँग्रेसचे सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी केले आहे. गेल्या सात आठ वर्षापासून केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपा सरकारने देशातील बेरोजगारी वाढती महागाई यावर कोणतेच नियंत्रण न मिळवता सत्तेच्या जोरावर विरोधकावर सुडाचे राजकारण करण्याचे काम केले आहे. शेतक- यांच्या प्रश्नावर गांभिर्याने न पाहता उद्योगपतीचे चोचले पुरविण्यात केंद्र सरकार मशगुल असल्याने देशातील नवयुवक भाजपच्या

अशा धोरणांच्या विरोधात तीव्र नाराजी  व्यक्त करीत आहे. त्याम  ुळे खासदार राहुल गांधी यांनी काढलेल्या यात्रेला देशातुन मोठ्या प्रमाणात युवकाकडुन प्रतिसाद मिळत असल्याने दि. १४ नोव्हेंबर सोमवार रोजी ही यात्रा हिंगोली शहरात दाखल होत असून या  यात्रेला सेनगांव तालुक्यातील काँग्रेस पदाधिकारी व शेतकर्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन काँग्रेसचे सेनगाव तालुका अध्यक्ष भास्करराव बेंगाळ यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने