मा. पोलीस अधीक्षक हिंगोली यांचे मार्गदर्शनात संपुर्ण जिल्हयात विशेष कोम्बींग (ऑलआउट) ऑपरेशन ची कार्यवाही

मा. पोलीस अधीक्षक  हिंगोली यांचे मार्गदर्शनात  संपुर्ण जिल्हयात विशेष कोम्बींग (ऑलआउट) ऑपरेशन ची कार्यवाही

मा. पोलीस अधीक्षक हिंगोली श्री. जी. श्रीधर साहेब यांनी हिंगोली जिल्हयाचा पदभार स्विकारल्यानंतर जिल्हयातील सराईत गुन्हेगार व लपुन छपुन चालणारे अवैध्द धंदे बाबत कडक भूमिका घेत तसेच यापुर्वी गंभीर गुन्हयातील तसेच चोरी, जबरी चोरी, घरफोडी व दरोडा या गुन्हयातील आरोपींना नियमित तपासणे व त्यांचे विरूध्द कडक प्रतिबंधक कार्यवाही सुरू केली असुन मा. पोलीस अधीक्षक साहेबांनी वसमत तालुक्यातील पळशी येथील राहणारे सराईत गुन्हेगार १) सुदर्शन मोहन शिंदे वय ३५ वर्ष २) योगेश गुलाबसिंग पवार वय ३५ वर्ष ३) सचिन मोहन शिंदे वय ३० वर्ष यांना कलम ५५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम अन्वये ०२ वर्षाकरीता हिंगोली जिल्हयातुन हददपार केले आहे. तसेच हददीपारीचा आदेश असतांनाही प्रतिबंधीत क्षेत्रात वावरणा-या ०२ इसमांना पकडुन कलम १४२ म.पो. का. अन्वये कार्यवाही करण्यात आली मोठया प्रमाणात जिल्हयात अवैध्द धंदे दारू, हातभटटी, जुगार, मटका, अवैध्द शस्त्र, गांजा व गुटखा याबाबत स्थानिक गुन्हे शाखा व स्थानिक पोलीस तसेच दहशतवाद विरोधी पथकाने मोठया प्रमाणात करून गुन्हे दाखल व प्रतिबंधीत कार्यवाही केलेली आहे.
त्याचाच भाग म्हणुन गुन्हेगारांची तपासणी, अवैध्द धंदे विरूध्द कार्यवाही, फरार व पाहीजे तसेच न्यायालयाचे वारंट मधील आरोपी शोध अशा व्यापक हेतुने मा.पोलीस अधीक्षक श्री.जी.श्रीधर यांचे मार्गदर्शनात दिनांक - १६ / ११ / २०२२ चे रात्री २३.०० पासुन दिनांक- १७/११/२०२२ चे सकाळी ०५.०० वा. पावेतो संपुर्ण जिल्हयात सर्वच पोलीस स्टेशन अंतर्गत विशेष कोम्बींग ऑपरेशन राबविण्यात आले होते. सदर मोहीमेत उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विवेकानंद वाखारे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री किशोर कांबळे, स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.श्री. उदय खंडेराय, पो.नि.श्री. पंडीत कच्छवे, पो. नि. श्री. बाळकृष्ण मळघणे, पोनि श्री. सुनिल निकाळजे, पो.नि. विदयासागर श्रीमनवार, पो.नि. श्री. चंद्रशेखर कदम,पो.नि.श्री. रणजित भोईटे, पो. नि. श्री. विश्वनाथ झुंजारे, सपोनि श्रीदेवी पाटील, सपोनि,पंढरी बोधनापोड, सपोनि विलास चवळी, सपोनि गजानन मोरे, सपोनि गजानन बोरोटे, सपोनि अरूण नागरे, व सर्वच पोलीस स्टेशन मधील दुयम पोलीस अधिकारी व मोठया प्रमाणात पोलीस अंमलदार हे सहभागी झाले होते.
सदर मोहीमेत जिल्हयातील एकुण ४१ ठिकाणी जेथे रेकॉर्ड वरील व सराईत गुन्हेगार आहेत अशा ठिकाणी पोलीस पथकाकडुन गुन्हेगार तपासणी करण्यात आली. तसेच जिल्हयातील मोक्का मधील फरार व तडीपार आदेश झालेले तसेच फरार व पाहीजे असलेले आरोपींचीही तपासणी करण्यात आली.

तसेच सदर मोहीमेत स्थानिक गुन्हे शाखेने अवैध्द शस्त्र बाळगणा-या विरूध्द ०२ तर हिंगोली शहर पोलीस स्टेशन यांचे कडुन ०१ असे अवैध्द शस्त्र बाळगणा-या विरूध्द हत्यार कायदा कलम ४/२५ अन्वये अन्वये ०३ गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर मोहीमेत पो.स्टे. औंढा नागनाथ येथील गुरनं. ३३८/२०२२ कलम ३,७ ई.सी. अॅक्ट गुन्हयातील मागील १५ दिवसापासुन फरार असलेले ०२ आरोपींना औंढा नागनाथ पोलीसांनी शोध घेवुन त्यांना अटक करण्यात आले.

सदर मोहीमेमध्ये मा.न्यायालयाकडुन वेळोवेळी समन्स निघुनही तारखेवर न्यायालयात हजर राहत नव्हते व ज्यांचे बाबत मा.न्यायालयाकडुन अटक वारंट निघाले होते अशा एकुण २५ अटक वारंट मधील इसमांना पकडुन न्यायालयात हजर करण्यात आले. तसेच जामीनपात्र २० वारंट सदर मोहीमेत तामील करण्यात आले.

हददपारीचे आदेश असतांनाही प्रतिबंधीत क्षेत्रात लिंबाळा मक्ता परीसरात वावरतांना मिळुन आलेले नामे- संजय पाडया पवार व करण जिल्हयान्या पवार यानां पो.स्टे. हिंगोली ग्रामीण पोलीस पथकाने पकडुन त्यांचे विरूध्द कलम १४२ म.पो.का. अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने