भारत जोडो यात्रा हिंगोलीतआदित्य ठाकरे यांची साथ; सरकारविरुद्ध घोषणाभाजप, संघावर टीका

भारत जोडो यात्रा हिंगोलीत
आदित्य ठाकरे यांची साथ; सरकारविरुद्ध घोषणा
भाजप, संघावर टीका

महाराष्ट्र 24 न्यूज 
नेटवर्क12/112022

हिंगोली नांदेड जिल्ह्यातून चोरांबा फाटा येथून निघाल्यानंतर सायंकाळी चार वाजता कळमनुरी तालुक्यातील हिवरा फाटा येथे खा. राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा दाखल झाली. एक तास उशीर झाल्याने येथून ते झपाट्याने पुढे निघून गेले.
यादरम्यान खा. राहुल गांधी यांच्यासमवेत शिवसेनेचे युवानेते तथा माजी मंत्री आदित्य ठाकरे हे यात्रेत सहभागी झाले होते. याशिवाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी प्रदे- शाध्यक्ष माणिकराव ठाकरे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आ. प्रज्ञा सातव, शिवसेनेचे आ. राहुल पाटील आदी नेते यात्रेत होते. हिवरा फाटा येथून राहुल गांधी यांनी यात्रेचा वेग वाढविला. रस्त्यात ते काही
वारंगा फाटा येथे झालेल्या कॉर्नर सभेत राहुल गांधी यांनी भाजप, संघावर टीका केली. देशात विद्वेषाची भावना निर्माण करण्याचे प्रयत्न भाजप, संघ करीत असून, त्याविरोधात यात्रा असल्याचे त्यांनी नमूद केले. कन्याकुमारीपासून निघालेल्या यात्रेला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे ते म्हणाले. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी यात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या वेळी आ. प्रज्ञा सातव यांनी प्रास्ताविक केले.

जणांना जवळ बोलावून बोलताना दिसत होते. शालेय मुले, युवक, डॉक्टरांसह विविध क्षेत्रातील मंडळीचा यात समावेश होता. रस्त्याने चालत असतानाच ते या मंडळींशी विविध विषयांवर चर्चा करीत होते. दुहेरी कठडे, सीआरएफ व स्थानिक पोलीस अशा दुहेरी सुरक्षा व्यवस्थेत त्यांचा हा ताफा अवघ्या काही वेळातच डोंगरकडा येथे
पोहोचला.

हिंगोली जिल्ह्यातील स्थानिक नेते माजी खा. सुभाष वानखेडे, संपर्कप्रमुख बबन थोरात, विनायक भिसे, गोपू पाटील, कृष्णराव पाटील, नांदेडचे कोकाटे, बालासाहेब देशमुख आदींसह कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. ५० खोके एकदम ओके अशा घोषणाही यावेळी दण्यात आल्या

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने