बुधवारी हिंगोली वसमत येथे रेल्वे रोको आंदोलन बाजारपेठे बंद राहणार

 बुधवारी हिंगोली वसमत येथे रेल्वे रोको आंदोलन बाजारपेठे बंद राहणार

महाराष्ट्र 24 न्यूज नेटवर्क
21 नोव्हेंबर 2022 
  हिंगोली जिल्हा बंद व रेल्वे आंदोलन होणारच
     हिंगोली जिल्ह्यातील रेल्वे प्रश्नावर हिंगोली करांचा राग आंदोलनाची दिशा ठरवण्या करता आयोजित बैठकीत दिसुन आला  असून दिनांक 23 नोव्हेंबर रोजी रेल्वे प्रश्नावर जिल्हा बंद व रेल्वे रोको अंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.
   हिंगोली मार्गे जाणारी जालना - छपरा एक्सप्रेस  वळविण्यात आली   ती  ठरल्या प्रमाणे आमच्या हक्काचीच असल्याने पूर्णा - हिंगोली -  मार्गानेच सुरू करण्यात  यावी.
   वाशिम - हिंगोली या रेल्वे मार्गावर मुंबईला जाण्या करता एक ही रेल्वे नसल्याने मुंबई साठी रेल्वे  सुरू करण्यात यावी ,
  हिंगोली येथील रेल्वे स्टेशन परिसरात मोठी रिकामी जागा असल्याने त्या ठिकाणी  व्यापार पेठेला आवश्यक असलेले गुड्स शेड तातडीने मंजूर करून उभारण्यात यावेत,
 वसमत रेल्वे स्टेशन वरील  प्लॕटफॉर्म नं. २ हा गुडस् शेड करता वापर ला जात आहे त्याऐवजी प्लॅटफॉर्म नंबर दोन चे पुनर्निर्माण करून  प्रवाशा करता सर्व सुविधा युक्त प्लॅटफॉर्म निर्माण करावा
  या मागण्या घेऊन हिंगोली जिल्हा बंद व रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणारच असल्याचे प्रमुख व्यापारी, पत्रकार , विविध राजकीय सामाजिक संघटनाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत शिकामोर्तब करण्यात आले आहे ह्या  आंदोलनात सहभागी होण्या करता सर्वांनी २३  तारखेला सकाळी ८.३० वाजता गांधी चौकात  जमा होऊन रेल्वे स्टेशन कडे जावयाचे असल्याने व्यापाऱ्यांनी आप आपली प्रतिष्ठान बंद करून  यात सहभागी व्हावे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने