५८ व्या पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे थाटात उदघाटन; मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
हिंगोली (प्रतिनिधी)- हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन द्वारा आयोजित ५८ व्या पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धेचे अर्जुन पुरस्कार सन्मानित काकासाहेब पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत व मान्यवरांच्या उपस्थितीत मोठया थाटात उदघाटन करण्यात आले.
येथील रामलिला मैदानावर शनिवार दि.५ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता ५८ व्या पुरुष-महिला राज्य अंजिक्यपद व निवड चाचणी खो-खो स्पर्धा २०२२-२३ चा उदघाटन सोहळा संपन्न झाला. व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी खा.ऍड.शिवाजी माने यांची उपस्थिती होती. उदघाटक म्हणुन अर्जुन पुरस्कार सन्मानित काकासाहेब पवार उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन आ.तान्हाजी मुटकुळे, आ.संतोष बांगर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, माजी आ.रामराव वडकुते, जिल्हा क्रीडा अधिकारी संजय मुंढे, माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, माजी नगराध्यक्षा अनिता सुर्यतळ, ऑल इंडिया खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ.चंद्रजित जाधव, महाराष्ट्र खो-खो असोसिएशनचे ऍड.गोविंद शर्मा, कोषाध्यक्ष ऍड.अरुण देशमुख, सहसचिव प्रा.डॉ.पवन पाटील, सहसचिव डॉ.प्रशांत इनामदार, सहसचिव प्रा.राजेश सोनवणे, माजी सरचिटणीस संदीप तावडे, विशेष समाज कल्याणचे सहाय्यक संचालक शिवानंद मिनगिरे, परभणी खो-खो असोसिएशनचे संतोष सावंत, हिंगोली जिल्हा खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष शिवदास बोड्डेवार, उपाध्यक्षा मनिषाताई काटकर, सचिव प्रा.डॉ.नागनाथ गजमल, शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित प्रा.उत्तमराव इंगळे, माजी नगराध्यक्ष गणेश लुंगे, सेना जिल्हाप्रमुख विनायकराव भिसे पाटील, ऍड.के.के.शिंदे, प्रशांत सोनी, हमीद प्यारेवाले आदीसह मान्यवरांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला हिंगोली तालुका खो-खो असोसिएशन आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करुन करण्यात आले. यानंतर ध्वजारोहण अर्जुन पुरस्कार सन्मानित काकासाहेब पवार यांच्या शुभहस्ते मान्यवरांच्या उपस्थित संपन्न झाले. राज्यभरातील ४८ संघ खेळांडुचे संचलन मैदानावर संपन्न झाले. राष्ट्रीय खेळांडु सुरज शिंदे क्रीडा ज्योतीचे आगमन झाल्यानंतर माजी खा.ऍड.शिवाजी माने यांच्याहस्ते ज्योत प्रज्वलित करण्यात आली. राष्ट्रगीतानंतर संगीत साधना विद्यालय हिंगोलीच्या संचनाने स्वागत गीत म्हटले. पाहुण्यांचे स्वागत सत्कार संपन्न झाले. प्रास्ताविक हिंगोली तालुका खो-खो असोसिएशनचे अध्यक्ष तथा स्वागताध्यक्ष कल्याण देशमुख यांनी केले. यावेळी ऑल इंडिया खो-खो फेडरेशनचे सहसचिव डॉ.चंद्रजित जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. आ.तान्हाजी मुटकुळे यांनी उत्कृष्ट आयोजनाबद्दल संयोजन समितीचे कौतुक केले. उपस्थित राज्यभरातील खेळांडूना शुभेच्छा दिल्या. हिंगोलीत स्पर्धा आयोजन वाढले पाहिजे यासाठी प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी म्हटले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यंानी राज्यभरातील खेळांडुचे प्रशासनावतीने प्रथमःता स्वागत केले. हिंगोली जिल्हयात विविध खेळांचे आयोजन व्हावे, प्रशासन नेहमीच सहकार्यात आहे, असे त्यंानी म्हटले. आ.संतोष बांगर यांनी राज्यभरातील खेळांडुना शुभेच्छा दिल्या. उद्घाटन सोहळयात गणेश लुंगे, जम्मु यादव, बाबुराव कदम, दिगांबर भुतनर, ज्ञानेश्वर होडगीरयांच्यासह आंतरराष्ट्रीय खेळांडु सुप्रिया गाढवे यांचा सन्मान करण्यात आला. अध्यक्षीय समारोप माजी खा.ऍड.शिवाजी माने यांनी केला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन हरीभाऊ मुटकुळे यांनी तर उपस्थितांचे आभार खो-खो असोसिएशनचे प्रा.नरेंद्र रायलवार यांनी मानले. या उद्घाटन सोहळयासाठी राज्यभरातील खेळांडु, पंच, संघ व्यवस्थापक क्रीडा प्रेमी हजारोच्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा