हिंगोलीत खो- खोचे साखळी सामने एकापेक्षा एक सरस
महाराष्ट्र 24 न्यूज
नेटवर्क 6/11 2022
डे- नाईट सामने पाहण्यासाठी क्रीडा शौकिनाकडून मैदानावर गर्दी
हिंगोली - हिंगोलीत पाहिल्यांदाच दोन सत्रात खेळविण्यात आलेल्या खो-खोच्या साखळी सामन्यात शनिवारी ३२ संघात चुरशीची लढत झाली. यात साखळी सामन्यात सर्वच संघांनी तुल्यबळ लढत दिल्याचे पहावयास मिळाले. सामने पाहण्यासाठी अक्षरशः मैदानावर क्रीडा प्रेमींनी गर्दी केल्याचे चित्र होते. तर आपला संघ विजयी होण्यासाठी खेळाडूंना बाहेरील खेळाडूंनी प्रोत्साहन दिले.
हिंगोली येथील रामलीला मैदानावर पहिल्यांदाच ५८ वी राज्यस्तरीय पुरुष ,महिला राज्य अजिंक्यपद व निवड चाचणी खो-खो सामन्याचे आयोजन महाराष्ट्र खो-खो असोसिएशन यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो- खो असोसिएशन यांनी पुढाकार घेतला. दरम्यान , शनिवारी (ता.५) रोजी भव्य शोभायात्रा काढून खो-खो स्पर्धेला मान्यवरांच्या उपस्थितीत सुरुवात झाली.
या राज्य स्पर्धा दोन सत्रात खेळविण्यात येत असून आठ गट तयार करण्यात आले असून एका गटात तीन संघाचा समावेश आहे. त्यानुसार राज्यभरातून पुरुष व महिला असे ४८ संघ या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.जवळपास दीड हजार खेळाडू यांच्यासह तांत्रिक समिती व पंच असे मिळून एकूण ४० मंडळी देखील स्पर्धेदरम्यान आपले काम उत्तमरीत्या पार पाडत आहेत.
शनिवारी झालेल्या सकाळच्या सत्रात सोळा संघात चुरशीचे सामने पहावयास मिळाले. यामध्ये प्रामुख्याने पुणे विरुद्ध औरंगाबाद यांच्यात झालेल्या सामन्यात पुणे संघाने प्रतिस्पर्धी संघाला१७ धावानी विजय मिळवला .तर मुंबई उपनगर विरुद्ध जालना यांच्यात झालेल्या सामन्यात मुंबई उपनगरने सहा गुणांनी विजय मिळवला. सांगली विरुद्ध धुळे यात सांगली संघाने बारा गुणांनी विजय मिळवला. पुणे विरुद्ध परभणी यांच्यातील झालेला सामना पुणे संघांनी पाच गुणांनी विजय मिळवला. ठाणे विरुद्ध नंदुरबार यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत पुणे संघाने चार गुणांनी निसटता विजय मिळवला. ठाणे विरुद्ध परभणी ड गटातील सामन्यात ठाणे संघाने १८ गुणांनी विजय मिळवला. तर मुंबई विरुद्ध रायगड यांच्यात झालेला सामना मुंबईने तीन गुणांनी जिंकला. सोलापूर विरुद्ध हिंगोली यांच्यात झालेला सामना सोलापूर संघाने तीन गुणांनी विजय मिळवला. रत्नागिरी विरुद्ध जळगाव यांच्यातील सामना रत्नागिरी संघाने १४ गुणांनी विजय मिळवला. सांगली विरुद्ध हिंगोली ई गटात झालेला सामना सांगली संघाने आठ गुणांनी जिंकला. सातारा विरुद्ध लातूर यांच्यात फ गटातील सामना सातारा संघाने तीन गुणांनी जिंकला. अहमदनगर विरुद्ध लातूर यांच्यातील ग गटात झालेला सामना नगर संघाने १८ गुणांनी विजय मिळवला. तर सोलापूर विरुद्ध नांदेड ग महिला गटातील सामन्यात सोलापूर संघाने विजय मिळवला.उस्मानाबाद विरुद्ध नांदेड पुरुष गटातील सामन्यात उस्मानाबाद संघाने ८ गुणांनी विजय मिळवला. मुंबई उपनगर विरुद्ध सिंधुदुर्ग महिला गटातील सामन्यात मुंबई उपनगर संघाने १३ गुणांनी विजय मिळवला.
तसेच शनिवारी सायंकाळी झालेल्या सत्रात १५ संघात साखळी सामने पार पडले, यामध्ये रत्नागिरी विरुद्ध जालना पुरुष गट यात रत्नागिरी संघाने २३ गुणांनी विजय मिळवला. तर धुळे विरुद्ध सातारा पुरुष गटातील सामना हा तुल्यबळ झाला दोन्ही संघाने जबरदस्त खेळ केल्याने ही लढत बरोबरीत सुटली. रायगड विरुद्ध परभणी महिला गटातील सामन्यात रायगड संघाने चार गुणांनी विजय प्राप्त केला. धुळे विरुद्ध नंदुरबार महिला गटातील सामन्यात धुळे संघांनी पाच गुणांनी विजय मिळविला. सिंधुदुर्ग विरुद्ध परभणी पुरुष गटातील सामन्यात परभणी संघाने आठ गुणांनी विजय मिळवला. तर बीड विरुद्ध रायगड पुरुष गटातील सामन्यात बीड संघ चार गुणांनी विजयी झाला. नाशिक विरुद्ध हिंगोली पुरुष गटात झालेल्या सामन्यात नाशिक संघाने एका गुणांनी विजय मिळवला. पालघर विरुद्ध जळगाव महिला गटातील सामन्यात पालघर संघाने बारा गुणांनी विजय मिळवला. नाशिक विरुद्ध हिंगोली महिला गटातील सामन्यात नाशिक संघाने एक डाव व वीस गुणांनी विजय मिळविला. मुंबई विरुद्ध लातूर महिला गटात झालेल्या सामन्यात मुंबईने पाच गुणांनी विजय मिळवला. नंदुरबार विरुद्ध लातूर पुरुष गटात खेळविण्यात आलेल्या सामन्यात नंदुरबार संघाने एक डाव एक गुणांनी विजय मिळवला. अहमदनगर विरुद्ध नांदेड महिला गटातील सामन्यात अहमदनगर संघाने आठ गुणांनी विजय मिळवला. पालघर विरुद्ध नांदेड पुरुष गटातील सामन्यात पालघरने दहा गुण घेत विजय प्राप्त केला. तर औरंगाबाद विरुद्ध सिंधुदुर्ग महिला गटातील सामन्यात औरंगाबाद संघाने प्रतिस्पर्धी संघावर चार गुणांनी विजय मिळवला. सांगली विरुद्ध सातारा पुरुष गटातील सामन्यात सांगली संघाने एक डाव व सात गुणांनी मोठा विजय मिळावीत संघाला विजय मिळवून दिला. स्पर्धेदरम्यान क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. स्पर्धा यसस्वीतेसाठी महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली हिंगोली तालुका खो- खो असोसिएशनचे पदाधिकारी ,क्रीडाधिकारी परिश्रम घेत आहेत.
चौकटीचा मजकूर
--------------------
बारा थरांची गॅलरी ठरतेय आकर्षण....
राजतस्तरीय खो- खो स्पर्धेसाठी चार मैदानाची उभारणी केली असून दिवस रात्र प्रकाश झोतात साखळी सामने सुरू आहेत. क्रीडा प्रेमींना सामने पाहण्यासाठी बारा थरांची आकर्षक 6गॅलरी उभारली आहे. संपूर्ण परिसरात एलईडी स्क्रीन बसविल्या असून थेट सामन्याचे प्रक्षेपण दाखवले जात आहे.
चौकटीचा मजकूर
-------------------
हिंगोलीला पाहिल्यांदाच खो-खो स्पर्धेचा मान...
५८ वी राज्यस्तरीय पुरुष , महिला खो-खो स्पर्धेचा मान पहिल्यांदाच हिंगोलीला मिळाल्याने हिंगोली तालुका असोसिएशनकडून शिस्तबद्ध नियोजन केले असून हिंगोलीच्या शिररपेचात खो- खो स्पर्धेमुळे मानाचा तुरा रोवला गेला आहे. राज्यभरातूनन आलेल्या खेळाडुकडून उत्कृष्ट व्यवस्था व नियोजन पाहून भारावून गेले आहेत.
टिप्पणी पोस्ट करा